पण या स्टार पत्नीच्या फॅशनविषयी बोलताना तिची स्टायलिस्ट डेलना सेठनंही सांगितलं होतं की, ‘स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतील असेच कपडे मीराला घालायला आवडतात. स्टाइल स्टेटमेंटबद्दल तिची निवड सुद्धा फारच स्पष्ट असते. मीराच्या स्टाइलमध्ये नेहमीच ग्लॅमर आणि पारंपरिकतेचं परिपूर्ण मिश्रण पाहायला मिळतं. यामुळेच बी-टाउनमधील तारकांमध्येही तिनं स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. पती शाहिद कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नामध्येही मीरा राजपूतचा आकर्षक लुक पाहायला मिळाला होता. (फोटो-इंडिया टाइम्स)
मीरा राजपूतचा स्टायलिश अवतार
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने २०१८ साली प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) व निक जोनसच्या(Nick Jonas) वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवली होती. पार्टीमध्ये या दोघांनाही पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. कारण शाहिद पार्टीमध्ये सहभागी होईल, याबाबत फार कमी लोकांना अपेक्षा होती.
तसंच मीराने सुद्धा बुरसटलेले नियम मोडल्याचं पाहायला मिळालं. मीराने पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावलीच, शिवाय स्वतःच्या स्टायलिश अवतारानं उपस्थितांचं लक्ष सुद्धा वेधून घेतलं.
साडीतील सुंदर मोहक लुक
मीरा राजपूतने पार्टीसाठी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मोनिका आणि करिश्माच्या ‘जेड’ फॅशन लेबलची फिकट गुलाबी रंगाची साडी निवडली होती. या साडीवर तिनं अतिशय स्टायलिश ब्लाउज परिधान केलं होतं. गुलाबी रंगाच्या या साडीवर बारीक स्वरुपातील आकर्षक वर्क करण्यात आलं होतं.
साडीच्या बॉर्डरवर सीक्वेंस, बीड्स आणि पर्ल वर्क डिझाइन आपण पाहू शकता. सिल्क-फ्लॉस आणि शिफॉन यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकपासून ही साडी तयार करण्यात आली आहे. मीरा राजपूत – कपूरनं नेसलेल्या या हँडमेड साडीचं नाव ‘श्रीधा’ असं होतं.
बोल्ड डिझाइनर ब्लाउजमुळे मिळाला ग्लॅमरस लुक
मल्टी डिटेलिंग साडीवर मीरा राजपूतने मॅचिंग ब्लाउज परिधान केलं होतं. ब्लाउजमध्ये डीप नेकलाइन आणि ऑफ शोल्डर लुक देण्यात आला होता. ब्लाउजवरही मागील बाजूस वजनदार पर्ल वर्क करण्यात आलं होतं.
परफेक्ट लुक मिळावा यासाठी मीराने जेट जेम्सचे डिझाइन केलेले ड्रॉपडाउन झुमके परिधान केले होते. डेवी मेकअप आणि सॉफ्ट वेव्ह्ज हेअरस्टाइल केली होती.
अंबानींच्या पार्टीमधील आकर्षक लुक
ईशा अंबानीचंही २०१८ साली जल्लोषात लग्न पार पडलं. या लग्नामध्येही मीरा राजपूतनं आपली स्टायलिश उपस्थिती दर्शवली होती. ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या लग्नासाठी मीरा राजपूतने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनीता डोंगरेनं डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता.
वेलवेट आणि सिल्क यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकपासून हा लेहंगा तयार करण्यात आला होता. आउटफिटवर पारंपरिक एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं. लेहंग्यासह ब्लाउज स्टाइल चोळीऐवजी शॉर्ट कुर्तीचा समावेश करण्यात आला होता.
दीपिकाच्या रिसेप्शन पार्टीतील लुक चर्चेत
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी मीरा राजपूतने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेली काळ्या रंगाची धोती साडी परिधान केली होती. या साडीमध्ये मीरा प्रचंड सुंदर दिसतेय.
शिफॉन फॅब्रिकच्या या साडीवर हँडमेड कस्टम चिकनकारी वर्क करण्यात आलं होतं. या साडीवर तिनं प्लंजिंग नेकलाइन डिझाइनचं ब्लाउज परिधान केलं होतं.
डार्क टोन मेकअपसह स्मोकी आईज आणि मिडल पार्टेड हेअरस्टाइलमुळे मीराला परफेक्ट लुक मिळाला होता. तसंच गळ्यामध्ये तिनं सुंदर रूबी डायमंड चोकर नेकलेस घातला होता.