[ad_1]
(कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका)
यासाठी अभिनेत्रीच्या वहिनीचेही उदाहरण घेतले जाऊ शकते. जिनं आपल्या लग्नसोहळ्यामध्ये टिपिकल लाल रंगाच्या लेहंग्याऐवजी हटके रंगाच्या कपड्यांची निवड केली होती. या शानदार पोषाखामध्ये ती प्रचंड सुंदर देखील दिसत होती. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम@shazamorani)
(अॅनिमल प्रिंट बिकिनीमधील बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट व बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)
पद्मिनी कोल्हापुरेंच्या मुलाचे डेस्टिनेशन वेडिंग
काही महिन्यांपूर्वी श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्माने त्याची गर्लफ्रेंड शजा मोरानीसोबत लग्नगाठ बांधली. डेस्टिनेशन वेडिंगसाठी त्यांनी मालदिवची निवड केली होती. साधारणतः नववधू लग्नासाठी लाल रंगाच्या पोषाखाची निवड करताना दिसते. हा रंग शुभ मानला जातो. दरम्यान शजाने या रंगाऐवजी पेस्टल कलरचा लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळालं.
(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)
कस्टम मेड होता लेहंगा
शजा मोरानीने आपल्या लग्नसोहळ्यात परिधान केलेला लेहंगा फॅशन डिझाइनर क्रेशा बजाजने डिझाइन केला होता. हा लेहंगा खास होता. लाइलॅक कलरचा हा सेट डिझाइनरने ‘लव्ह स्टोरी’ कलेक्शनअंतर्गत तयार केला होता. नववधूच्या लेहंग्यावर आपण सुंदर एम्ब्रॉयडरी पाहू शकता. मोहक एम्ब्रॉयडरीचा आधार घेत या पोषाखावर जोडप्याच्या प्रेम कहाणीशी संबंधित गोष्टी सुद्धा डिझाइन करण्यात आल्या होत्या.
(सोनम कपूरच्या मेंदी सोहळ्यात करिश्माने घातला होता सुंदर लेहंगा, मोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ)
सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता लेहंगा
नववधूने परिधान केलेला मॉडर्न पॅटर्न लेहंगा सिल्क आणि ऑर्गैंझा फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. यावर इंट्रिकट फ्लोरल डीटेलिंगसह सीक्वन वर्क जोडण्यात आलं होते. ज्यामुळे लेहंग्याला सुंदर लुक मिळाला होता. यासह मॅचिंग एम्ब्रॉयडर्ड प्रिंसेस कट ब्लाउज आणि वजनाने हलक्या असलेल्या दुपट्ट्याचाही समावेश होता. शजाचा लेहंगा सर्व पद्धतीच्या लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट होता. तसंच हा लेहंगा वजनाने हलका असल्याने नववधूसाठी कम्फर्टेबल पेहराव ठरू शकतो.
(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)
हातामध्ये घातल्या होत्या अशा बांगड्या
शजाने परिधान केलेल्या पेस्टल ब्रायडल लेहंग्यावर लाल रंगाच्या बांगड्या घातल्या नव्हत्या. याऐवजी तिनं हातामध्ये डिझाइनर बांगड्या घातल्याचे पाहायला मिळालं. याव्यतिरिक्त तिनं स्टडिड चोकर नेकलेस, मॅचिंग ईअररिंग्स, माथापट्टी आणि अंगठी असे दागिने घातले होते. या दागिन्यांमुळे शजाला मोहक व सुंदर लुक मिळाला होता.
(आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक)
श्रद्धाने देखील गडद रंगाचे कपडे निवडले नाहीत
आपल्या भावाच्या लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील गडद रंगाच्या कपड्यांऐवजी फिकट रंगाचेच कपडे परिधान करण्यावर भर दिला होता. तिनं लग्नसोहळ्यासाठी सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हे आउटफिट ‘PadmaSitaa’ ने तयार केलं होते. पद्मिनी कोल्हापुरे या फॅशन ब्रँडच्या को-फाउंडर आहेत. श्रद्धाने या लेहंग्यावर चोकर नेकलेस, ईयररिंग्स, स्टेटमेंट बांगड्या आणि अंगठी असे दागिने घातले होते. यामुळे तिला एकदम परफेक्ट लुक मिळाला होता.
(मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक)
[ad_2]
Source link