Home मनोरंजन ‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार

‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार

0
‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार

शासननामा न्यूज ऑनलाईन

ब्रेन ट्युमर (world brain tumor day 2021) हा एक असा आजार आहे ज्याचे आजही नाव ऐकले तर मनात धडकी भरते. हा एक असा आजार आहे जो अत्यंत जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. आज देखील सर्वात धोकादायक आजरामध्ये ब्रेन ट्युमरचा समावेश केला जातो. जेव्हा ब्रेन ट्युमर पहिल्यांदा जगाला कळला तेव्हा त्यावर फार उपचार नव्हते. हळूहळू त्यावर संशोधन होऊन आज ब्रेन ट्युमर हा आजार आपल्या नियंत्रणात आला आहे. म्हणजे कोणाला ब्रेन ट्युमरचे निदान झाले आणि ते बरे होण्या इतपत असेल तर त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकते.

याचा आजाराशी निगडीत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ‘ब्रेन ट्युमर डे’ साजरा केला जातो. आज याच दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया की या आजारात कोणते पदार्थ खाऊ नयेत. कारण आहार हा कोणत्याही गंभीर आजारातील महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे त्याबद्दल योग्य माहिती असायला हवी.

जागतिक ब्रेन ट्युमर डे

जागतिक ब्रेन ट्युमर हा दिवस 8 जून रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनने केली आणि आता संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना या आजराविषयी माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्युमर बद्दल आजही लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत आणि समाजात अफवा आहेत. त्या दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण चुकीच्या माहितीमुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो.

केमोथेरपी सुरू असेल तर

ब्रेन ट्युमरच्या उपचारपद्धती मधील केमोथेरपी एक महत्त्वाची उपचारपद्धती आहे. ही उपचार पद्धती सुरू असेल तर आहारा बाबत तुम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पाश्चराईज्ड न केलेल्या दुधापासून तयार केलेले दही किंवा असे दूध केमोथेरपीच्या काळात खाणे टाळावे. यापासून तयार झालेले चीझ देखील खाऊ नये. अंडी वा कच्चे मांस किंवा नीट न शिजलेले मांस वा मासे खाणे खास करून टाळावे. हे सर्व पदार्थ केमोथेरपीच्या काळात खाणे टाळावे कारण जर तुम्ही खाल्ले तर त्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. म्हणून केमोथेरपीच्या दरम्यान डॉक्टरांनीच दिलेले डाएट फॉलो करावे.

तेलकट पदार्थ कमी करा

जर ब्रेन ट्युमरचे निदान झाले असेल तर तेलकट पदार्थांपासून लांबच राहा. अनेक जाणकारांच्या म्हणण्यानुसार तेलकट पदार्थ ब्रेन ट्युमर ग्रस्त व्यक्तीने खाणे धोकादायक असू शकते. यामुळे जर उपचार सुरू असतील तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. तेलकट पदार्थ खाल्ल्याने शारीरिक स्थितीवर सुद्धा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे शक्यतो तेलकट पदार्थ टाळा आणि पौष्टिक पदार्थच खा. जेवढा संतुलित आहार तुम्ही घ्याल त्याचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर ब्रेन ट्युमरला नियंत्रित करण्यात होईल. शिवाय इतर सामान्य लोकांनीही तेलकट व जंक फूडवर लगाम घालणं चांगलं असतं कारण हे पदार्थ आपल्या मेंदू निरोगी राहण्यास व कार्य उत्तमरित्या चालण्यात अडथळा आणू शकतात.

गोड पदार्थांचे कमी सेवन

गोड पदार्थ हे ब्रेन ट्युमरच्या रुग्णाला पूरक समजले जात नाहीत. खास करून साखरेचे प्रमाण टाळणे हा यामागचा हेतू असतो. त्यामुळे च्युइंगम, चॉकलेट, गोड मिठाई, ज्यूस, कृत्रिम गोड पदार्थ खाणे टाळा. तुम्ही याबाबत आपल्या आहारतज्ज्ञांशी चर्चा करू शकता. ब्रेन ट्युमरची पातळी काय आहे त्यावरून आहार ठरतो आणि गोड पदार्थ खायचे की नाहीत ते सांगितले जाते. त्यामुळे तुमचू स्थिती तपासून डॉक्टर तुम्हाला तुम्ही काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही ते सांगतील. मात्र शक्यतो आपल्या मनाचा आणि जिभेचा मोह आवरून गोड पदार्थ खाऊ नयेत.

घरचा आहारच घ्या

बाहेरील खाद्यपदार्थ किंवा उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. अन्न चांगले शिजवलेले आणि स्वच्छ आहे ना याची काळजी घ्या. ब्रेन ट्युमर आजारात आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. जर योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा फटका शारीरिक स्थितिवर होऊ शकतो. म्हणून संतुलित आणि पौष्टिक आहारावरच भर द्यावा. जंक फूड आणि फास्ट फूड न खाल्लेले उत्तम, जर आहारतज्ज्ञांनी परवानगी दिली तरच तुम्ही हे पदार्थ अत्यंत कमी प्रमाणात खा. अन्यथा त्यांच्यापासून लांबच रहा. तर मंडळी ही माहिती आपल्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा आणि ब्रेन ट्युमर बाबतीत आहारा संदर्भात काय काळजी घ्यावी याबद्दल त्यांना जागृत करा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here