Home मनोरंजन Disha Vakani and Mayur Padia Love Story: ‘तारक मेहता’च्या दयाबेननं ‘या’मुळे सामान्य व्यक्तीशी केलं लग्न, कारण वाचून तुमचाही बदलेल दृष्टीकोन

Disha Vakani and Mayur Padia Love Story: ‘तारक मेहता’च्या दयाबेननं ‘या’मुळे सामान्य व्यक्तीशी केलं लग्न, कारण वाचून तुमचाही बदलेल दृष्टीकोन

0
Disha Vakani and Mayur Padia Love Story: ‘तारक मेहता’च्या दयाबेननं ‘या’मुळे सामान्य व्यक्तीशी केलं लग्न, कारण वाचून तुमचाही बदलेल दृष्टीकोन
प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) सध्या टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर आहे. पण कोणत्या-न्-कोणत्या कारणामुळे ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. चाहतेमंडळी मालिकेतील दिशाच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे निर्मात्यांनीही तिची जागा रिक्त ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान दिशाच्या कमबॅकबाबत काहीही सांगता येत नाही. वर्ष २०१७मध्ये अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमुळे ब्रेक घेतला होता, पण यानंतर तिच्याबाबत कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.

याच कारणामुळे बहुतांश लोकांना दिशाच्या खासगी आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे. यापैकीच एक बाब म्हणजे दिशाने एखाद्या अभिनेत्याऐवजी मुंबईतील Chartered Accountant मयूर पांड्यासोबत लग्न का केलं? दरम्यान लग्नाच्या काही महिन्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित कित्येक रहस्ये उलगडली होती. आयुष्याचा जोडीदार म्हणून मयूरची निवड का केली? याचंही उत्तर तिनं दिलं होतं.

​एकमेकांप्रति भावनिक ओढ असणे

दिशा वकानीने मुलाखतीत सांगितलं की,’आमची भेट अन्य कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमाद्वारे झाली नव्हती. आम्हा दोघांमध्ये साम्य असं काहीच नव्हतं. एकदा भेट झाल्यानंतर आम्ही काही वेळ एकमेकांची भेट घेत राहिलो, यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला’. दिशा वकानीच्या बोलण्यातून हेच दिसतंय की आयुष्याचा जोडीदार कसा असावा? याबाबत तिचे विचार पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होते.

वैवाहिक जीवनात योग्य समतोल राखता यावा यासाठी जोडीदाराच्या काही सवयी आपल्याशी स्वभावाशी जुळणे खूप महत्त्वाचे आहे, हे तिला माहिती होते. दरम्यान दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती चांगलं जोडपे होऊ शकत नाहीत, असेही अजिबातच म्हणणं नाहीय. पण काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये अशा जोडप्यात छोट्या-छोट्या गोष्टींमुळे अधिक तणाव निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं.

​एकमेकांना स्वीकारणे

दिशाचे पती मयूर पांड्या यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुमच्या दोघांचंही कार्य-क्षेत्र वेगवेगळे आहे, तर मग आपण लग्नाचा निर्णय कसा घेतला? यावर त्यांनी उत्तर दिलं की,’ज्या दिवशी मी दिशाला भेटलो, त्याच दिवशी नाते पुढे नेण्याचा विचार करू असा निर्णय घेतला होता. आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो.

म्हणूनच आम्ही एकमेकांसाठी योग्य आहोत की नाहीत? हे समजून घेण्यासाठी थोडासा वेळ द्यावा, असा मी विचार केला’. दरम्यान दिशा वकानी आणि मयूर पांड्या यांच्या नात्यातील सर्वात छान गोष्ट म्हणजे ते जसे आहेत तसेच दोघांनीही एकमेकांना स्वीकारलं.

​करिअर आणि कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी

दिशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे, जेथे वेळेच व्यवस्थापन अजिबात नसते; ही बाब मयूरला माहीत होती. तर मयूर सुद्धा कुटुंबाला प्राधान्य देणारा एक व्यक्ती आहे, हे दिशालाही योग्य प्रकारे ठाऊक होतं.

दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, हेच त्यांच्या नात्यातील एक मजबूत दुवा मानला जातो. लग्नानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कित्येक उदाहरणे आपण आसपास पाहिली असतील. यादरम्यान महिलांना एका चांगल्या जोडीदाराची कमतरता नक्कीच जाणवते.

(माधुरी म्हणते ‘माझा पतीच माझ्यासाठी हीरो’, तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार असाच असतो का?)

​प्राधान्यक्रमात कुटुंब नेहमीच पहिले

मालिकेच्या माध्यमातून दिशा घराघरात पोहोचली आहे. सर्वसामान्यांमध्ये तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय आहे. करिअरमध्ये तिनं चांगलं काम करून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलंच. पण लग्नानंतर तिनं कौटुंबिक जबाबदाऱ्याही योग्य पद्धतीने पार पाडल्या. लग्नानंतर पूर्ण दोन वर्ष दिशाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. पण मुलीच्या जन्मानंतर ती आपल्या कुटुंबात रमली.

दरम्यान दिशाच्या कमबॅकबाबत अनेक प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. पण एका मुलाखतीत अभिनेत्रीच्या पतीने स्पष्ट सांगितलं की करिअरचा निर्णय पूर्णपणे दिशाचाच असेल. पती-पत्नीच्या नात्यामध्येही बदल घडत असतात. जेथे एखादा जोडीदार आपल्या पत्नीच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करत नाही तर मयूर आजही दिशाच्या करिअरकडे पूर्णपणे लक्ष देताहेत.

​प्रेमाचे खोटे प्रदर्शन मांडू नये

डिजिटल युगामध्ये सध्या लोकांकडून प्रेमाचे खोटे प्रदर्शन मांडलं जात असल्याचं दिसतंय. क्षणाचाही विचार न करता कित्येक मंडळी नात्यातील चांगल्या-वाईट सर्वच गोष्टी चव्हाट्यावर मांडतात. पण दिशा आणि मयूरचं नातं फार सुंदर आहे. एकमेकांना खूश ठेवण्यासाठी दोघांनीही कधीही कोणत्याही गोष्टीचा देखावा केला नाही. विशेष म्हणजे दोघांनाही आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवणे पसंत आहे. यासाठी दोघंही वेळ काढण्याचा प्रयत्नही करतात, कदाचित हेच त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे सीक्रेट असावे.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here