दरम्यान कधी-कधी तिच्या फॅशनचं गणित बिघडल्याचंही पाहायला मिळतं. तारा बोल्ड पॅटर्नमधील कोणतेही कपडे आत्मविश्वास आणि ग्रेसने कॅरी करते. पण अति स्टायलिश पोषाख परिधान केल्यानं ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो.
तारा सुतारियाने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज
सेक्सी को-ऑर्ड सेट्स, क्रॉप-टॉप, स्कर्ट सेटपासून ते बॉलगाउन, ब्रालेट स्टाइल ब्लाउज, चिकनकारी ड्रेस आणि वजनदार लेहंग्यांपर्यंत; सर्वच पॅटर्नमधील कपडे तारा परिधान करते. या कपड्यांमधील लुकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातो. पण तिनं बोल्ड डिझाइनर ब्लाउजसह साडी नेसणं लोकांना आवडत नाही.
हॉट व बोल्ड डिझाइनचे ब्लाउज पाहून लोक आपल्या आवडत्या अभिनेत्रीनं याहून चांगला पोषाख परिधान करावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. तसंच तिच्यावर टीका करण्याचीही संधी सोडत नाहीत. २०१९मध्ये असेच काहीसे उदाहरण पाहायला मिळालं होतं. बच्चन कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या पार्टीसाठी तारा सुतारिया ब्रालेट स्टाइल ब्लाउजसह सुंदर साडी नेसली होती.
(‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार)
साडी प्रचंड सुंदर होती
ताराने पार्टीसाठी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या लेटेस्ट कलेक्शनमधील हँडमेड डिझाइनची मोनोक्रोमॅटिक सीक्वेंस पॅटर्न साडीची निवड केली होती. साडीवर तिनं स्ट्रॅपी स्लीव्ह्ज ब्लाउज परिधान केलं होतं. करड्या रंगाच्या साडीचं मटेरिअल चमकदार होतं. तसंच साडी तयार करण्यासाठी पूर्णतः शिफॉन फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. या साडीवर बारीक स्वरुपात सीक्वेंस एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा करण्यात आलं होतं.
बोल्ड स्टाइल चोळी
अभिनेत्रीनं साडीवर कटआउट स्लीव्ह्जचा ब्रालेट स्टाइल ब्लाउज परिधान केला होता. ब्लाउजसाठी शिफॉन आणि वेलव्हेट यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. बोल्ड ब्लाउज डिझाइनमुळेच तिचा संपूर्ण लुक बिघडल्याचं दिसतंय.
तारा सुतारियाचं स्टायलिंग
ताराने साडीवर केवळ लेअर्ड नेकलेस परिधान केलं होतं. परफेक्ट लुक मिळावा यासाठी ताराने गुलाबी रंगाचे लिपस्टिक, डेवी बेस, ग्लिटरी आयशॅडो, मस्कारा लॅशेज, ब्लश्ड चीक्स आणि बीमिंग हायलाइटर अशा ब्युटी प्रोडक्टचा उपयोग करून मेकअप केला होता. स्लीक लुक हेअरस्टाइलमध्ये ती प्रचंड स्टायलिश दिसत होती. पण ताराने केलेला मेकअप तिच्या साडीवर शोभून दिसत नव्हता.
लोकांनी केली टीका
तारा सुतारिया या कपड्यांमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. तिचा लुक प्रचंड हॉट दिसत होता. पण ब्रालेट पॅटर्न ब्लाउजमुळे लोकांनी तिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिला मेकअप व साडीमुळेही ट्रोल केलं. एका युजरनं असंही म्हटलं की ‘कौटुंबिक कार्यक्रमामध्ये असे कपडे परिधान करू नये’. अभिनेत्रीनं अयोग्य कपडे घातल्याचीही टीका काही लोकांनी केली.