Home मनोरंजन जेव्हा कतरिनाला दीपिकाने लग्नाचं निमंत्रण देण्यास दिला होता नकार, पण एका कारणामुळे बदलला निर्णय

जेव्हा कतरिनाला दीपिकाने लग्नाचं निमंत्रण देण्यास दिला होता नकार, पण एका कारणामुळे बदलला निर्णय

0
जेव्हा कतरिनाला दीपिकाने लग्नाचं निमंत्रण देण्यास दिला होता नकार, पण एका कारणामुळे बदलला निर्णय
‘अतूट मैत्री’ म्हणजे आपल्याला आयुष्यात मिळणारी सर्वात सुंदर भेट. पण कोणता मित्र खरा आहे आणि कोण मैत्रीचा केवळ देखावा करतोय, हे तुम्ही जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मैत्रीचे नाते भावना आणि विश्वासावरच टिकून राहते. मैत्रीचे नाते जोपर्यंत बहरत जाते, तोपर्यंत सारं काही छान व सुरळीत सुरू असते. पण काही कारणास्तव जेव्हा मैत्रीत बिघाड होतो, तेव्हा पक्के मित्रही एकमेकांचे शत्रू होण्यास वेळ लागत नाही.

बॉलिवूडमध्येही अशाच काहीशा घटना पाहायला मिळतात. बी-टाउनमधील काही तारका एकमेकींचे तोंड पाहणंही पसंत करत नाहीत. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) देखील त्यापैकी एक होत्या. आता या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचं सांगत आहेत. पण एक काळ असाही होता की दोघी एकमेकींचं नावही घेत नसत. (फोटो – इंडिया टाईम्स)

​दीपिकाने दिला होता स्पष्ट नकार

दीपिका आणि कतरिना यांच्यामध्ये वाद निर्माण होण्यामागील एकमेव कारण म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor), ही बाब सर्वांनाच माहिती आहे. हा अभिनेता सध्या आलिया भटसोबत (Alia Bhatt) रिलेशनशिपमध्ये आहे. कतरिनापूर्वी रणबीर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. एवढंच नव्हे तर एका बातमीनुसार, कतरिनासाठी दीपिकाची फसवणूक केल्याचंही रणबीरने २०११मध्ये मुलाखतीत सांगितलं होतं. पण ब्रेकअपच्या काही वर्षानंतर दीपिका व रणबीर यांची पुन्हा मैत्री सुद्धा झाली. पण दीपिकाने कतरिनाला माफ केल्याचं दिसलं नव्हतं.

​शीतयुद्ध सुरूच होतं

दीपिका पादुकोण आपली बहीण अनीषा पादुकोणसोबत ‘वोग BFF’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळेस नेहा धुपियाने दीपिकाला प्रश्न विचारला होता की, ‘स्वतःच्या लग्नाचं निमंत्रण कतरिनाला देणार का?’ यावर अभिनेत्रीनं ‘नाही’ असं उत्तर दिलं. यापूर्वीही दोघींमधील शीतयुद्ध लोकांना पाहायला मिळालं होतं. जेव्हा रणबीर आणि कतरिनाचा स्पेन बीचवरील फोटो व्हायरल झाला होता, तेव्हा दीपिकाने मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘कतरिनाला आपल्या सिनेमांबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे’ यावेळेस कतरिनाच्या मैत्रिणीनं यावर म्हटलं होतं की, ‘दीपिकाने आपले शहाणपणाचे शब्द स्वतःकडेच ठेवणे शिकले पाहिजे’.

​असा बदलला निर्णय

दीपिकाने २०१८मध्ये रणवीर सिंगसोबत थाटामाटात लग्न केलं. यावेळेस दीपिकाने आपल्या वेडिंग रिसेप्शनसाठी कतरिना कैफलाही निमंत्रण दिलं होतं. दीपिकानं याबाबत एका मुलाखतीत म्हटलं की, ‘मी सर्व काही विसरून तिच्याबरोबर पॅचअप केलं आहे. मी तिचा आदर करते कारण तिने इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्षे घालवली आहेत आणि ती एक उत्तम अभिनेत्री आहे’.

रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सहभागी होऊन कतरिनानेही म्हटलं की, ‘रिसेप्शन पार्टीमध्ये सर्वात शेवटी निघणाऱ्या पाहुण्यांपैकी मी देखील एक होते. मी तेथे खूप नाचले सुद्धा’. दीपिका व कतरिनाच्या बोलण्यावरून हे स्पष्ट दिसतंय की पूर्वीपेक्षा आता दोघींचं नाते अधिक चांगलं आहे. पण खरंच मैत्रीतील कटुता विसरणं शक्य आहे का?

​पुढाकार घेणे महत्त्वाचं

मैत्रीचे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाणं थोडेसं कठीणच असते, यात काही शंका नाही. पण अशक्य अजिबातच नव्हे. ज्या गोष्टींमुळे तुमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता, आता त्याचा काहीही संबंध नसल्यास आपण पुन्हा मैत्रीचा हात पुढे करू शकता. दीपिकाला स्वतःची चूक समजल्यानंतर तिनं कतरिनाला स्वतःच्या लग्नाचं निमंत्रण दिलंच तसंच अभिनेत्रीविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं जाहीरपणे स्वीकारलंही.

​वेळेनुसार बदल स्वीकारावा

काळानुसार लोकही बदलतात आणि त्यांचा प्राधान्यक्रमही बदलतो. अशा परिस्थितीत आपल्या नात्यात आलेली कटुता अनावश्यक आहे, असे वाटत असल्यास गुंता सोडवावा. यामुळे तुमचे नाते सुद्धा चांगलं होईल आणि मनावर कोणतेही ओझे राहणार नाही. कतरिना आणि दीपिकाचं नाते त्या लोकांसाठी धडा आहे, जे एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडमुळे चांगली मैत्री संपुष्टात आणतात. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मित्रांचा विरोध करणं टाळा.

​एकतर्फी नात्यात होतो त्रास

एकतर्फी मैत्री म्हणजे केवळ एकाच व्यक्तीकडून भावनिक नाते जोडलेले असते. अशा नात्यामध्ये कोणत्याही प्रकारे भावनिक ओढ, माया, प्रेम नसते. अशा स्वार्थी व्यक्तीसोबत आपण पुन्हा मैत्री करण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण रिलेशनशिप एक्सपर्टच्या माहितीनुसार, ‘जो व्यक्ती केवळ स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षांबाबतच विचार करतो, अशा माणसासोबत मैत्रीचं नाते व्यर्थचं असते’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here