[ad_1]
यामुळे तुमचं आणि बाळाचं आरोग्य देखील निरोगी राहतं. डिलिव्हरीनंतर नियमित डाएट आणि व्यायाम केल्यामुळे तुम्ही स्लिम होऊ शकता. डाएटमधील महत्त्वाचा भाग म्हणजे नाश्ता. तुम्ही नाश्तामध्ये कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करता याला देखील अधिक महत्त्व असतं. म्हणूनच वेट लॉससाठी नाश्तामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, वजन कमी करण्यासाठी त्याचा काय फायदा होतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्प्राउट्स
स्प्राउट्समध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लॅक्स आणि व्हिटॅमिन सीचा समावेश असतो. भारतीय आहारामध्ये स्प्राउट्सला हेल्दी पदार्थ म्हणून बोलल जातं. स्प्राउट्स खाताना आणि पचवताना शरीरामधील कॅलरीज् जास्त खर्च होतात. त्यामुळे स्प्राउट्सचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरामधील कॅलरीचे प्रमाण कमी होऊ लागते. स्प्राउट्सच्या मदतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तसेच स्प्राउट्सपासून काही पदार्थ देखील तुम्ही बनवू शकता. स्प्राउट्स एकमद बारीक करून त्यामध्ये मीठ आणि मसाला टाका. या तयार पीठाची पोळी तयार करा. ही तयार पोळी तुम्ही नाश्तासाठी खाऊ शकता.
(आई-बाबा बनण्यात सतत येतंय अपयश? मग आधी ‘ही’ माहिती जाणून घ्या नंतर ट्राय करा!)
पनीर
शाकाहारी लोकांसाठी पनीर अगदी उत्तम पर्याय आहे. डाएटसाठी पनीर देखील हेल्दी पदार्थ मानला जातो. पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी१२चा समावेश असतो. पनीरचं सेवन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे पोट भरलेलं राहतं. त्यामुळे इतर पदार्थ खाण्याची देखील तुमची इच्छा होत नाही. स्तनपान दरम्यान देखील पनीरचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामुळे स्तनपान करणाऱ्या आईचे शरीर मजबूत होते. तुम्ही पनीर ग्रील करून घरी बनवलेल्या सँडवीचबरोबर खाऊ शकता.
नाचणी
तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नाचणीचा समावेश देखील करू शकता. नाचणीमध्ये लोह, कॅल्शिअम आणि इतर पोषक घटकांचा समावेश असतो. नाचणीमुळे रक्तामधील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच नाचणीच्या सालामध्ये देखील फायबर पुरेशा प्रमाणात असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. याचा डाएटमध्ये समावेश केल्यामुळे लवकर वजन घटण्यास मदत मिळते. नाश्तासाठी तुम्ही नाचणीचे उत्तपम तयार करू शकता.
(प्रेग्नेंसीनंतर वेट लॉसदरम्यान महिला करतात ‘या’ मोठ्या चूका, अति घाई आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक)
पालक
निरोगी आरोग्यासाठी आणि डाएटसाठी हिरव्या पालेभाज्या अधिक उत्तम असतात हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पालक देखील डाएटमधील महत्त्वाचा भाग आहे. पालकमध्ये सर्वात जास्त कमी कॅलरी असतात. तसेच फायबर पुरेशा प्रमाणात असतात. एक कप पालकमध्ये जवळपास ७ ते ८ कॅलरी असतात. डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी पालकचा नाश्तामध्ये आवश्य समावेश करा. पालकमध्ये लोह, अँटिऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही नाश्तासाठी पालकचे पराठे बनवून त्याचे सेवन करू शकता.
केळं
केळ्यामध्ये कॅल्शिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. वर्कआउट सुरु करण्यापूर्वी नाश्ता म्हणून तुम्ही केळ्याचे सेवन करू शकता. केळ्यामध्ये समाविष्ट असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराला भरपूर लाभ मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते. डिलिव्हरीनंतरच्या काळात स्तनपान करणाऱ्या आईला उर्जेची भरपूर प्रमाणात गरज असते. अशावेळी देखील स्त्रिया केळ्याचे सेवन करू शकता. मात्र हे डाएट फॉलो करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.
बीट
बीटामध्ये अँटिऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे झटपट वजन कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच लो-कॅलरी नाश्तासाठी बीट हे उत्तम पर्याय आहे. बीटामध्ये कॅरोटीन, फॉलिक एसिड, व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी४चा समावेश असतो. डिलिव्हरीनंतर स्त्रियांसाठी बीटाचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. काही डॉक्टर्स देखील बीटाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुम्ही तुमच्या सलाडमध्ये बीटाचा समावेश करू शकता. डिलिव्हरीनंतर नाश्तामध्ये कोणत्या हेल्दी खाद्यपदार्थांचा समावेश असावा याचा एक चार्ट तयार करून ठेवा. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.
(मास्क न घालता देखील सुरक्षित राहू शकतात मुलं, फक्त ‘ही’ १ गोष्ट ठेवा कायम लक्षात!)
[ad_2]
Source link