Home मनोरंजन लठ्ठ बोलून हिनवायचे लोक, नाश्त्यात ‘हा’ सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन!

लठ्ठ बोलून हिनवायचे लोक, नाश्त्यात ‘हा’ सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन!

0
लठ्ठ बोलून हिनवायचे लोक, नाश्त्यात ‘हा’ सात्विक घरगुती पदार्थ खाऊन घटवलं २४ किलो वजन!
वाढलेले बेढब शरीर आणि त्याकडे पाहणाऱ्या लोकांच्या खिल्ली उडवणाऱ्या नजरा यामुळे 29 वर्षांची रिसर्च स्कॉलर मुनमुन भसीन खूपच ताण तणावात असायची. नेहमीच तिला लोकांच्या ट्रोलिंगला बळी पडावे लागायचे. लोकांचे तिच्या अंगावरून होणारे जोक्स आणि मक्सरी तिला आता नकोशी वाटत होती. या सर्वाचा तिच्या मानसिक आरोग्यावर देखील खूप प्रभाव पडला होता. मात्र तिने हार मानली नाही आणि तिला हसणाऱ्या लोकांच्या नजरा एक दिवस आश्चर्याने विस्फारल्या जातील असा चंग बांधला.

त्यातूनच सुरु झाला तिचा वेट लॉसचा प्रवास आणि अत्यंत मेहनत घेऊन तिने काही काळात 24 किलो वजन कमी करून दाखवले. बघा जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आज आपण जाणून घेऊया मुनमुनची प्रेरणादायी वेट लॉस स्टोरी!

  • नाव – मुनमुन भसीन
  • वय – 29 वर्षे
  • व्यवसाय– रिसर्च स्कॉलर
  • उंची– 5 फुट 3 इंच
  • पूर्वीचे वजन – 87 किलो
  • कमी केलेले वजन– 24 किलो
  • वजन कमी करण्यास लागलेला वेळ– 1 वर्षे

टर्निंग पॉइंट

मुनमुन म्हणते की, “जेव्हा जेव्हा मी आपल्या भोवताली स्लिम फिट मित्रमंडळींना पहायची तेव्हा मला या ग्रुप मध्ये असण्याबाबत खूप वाईट वाटायचं. कारण त्यांच्यात माझ्यासारखं जाड कोणीच नव्हतं. माझे काही मित्र मला खरंच सांभाळून घेणारे होते, त्यामुळे मी जास्त डिप्रेशन मध्ये गेले नाही, पण समाजाचा सामना करताना अनेक असे प्रसंग आले जेव्हा मला माझ्या जाड असल्यामुळे खूप वाईट वाटू लागलं आणि आत्मविश्वास सुद्धा कमी झाला. जो कोणी नवीन व्यक्ती मला भेटायचा तो माझे वाढलेले वजन पाहून कुत्सिक नजरेनेच माझ्याकडे पहायचा. मात्र त्यातूनच मला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली आणि आज मी त्यात यशस्वी झाली आहे.”

डाएट

आता आपण मूनमूनचे डायट जाणून घेऊया.

वेजिटेबल ओट्स सोबत दोन उकडलेल्या अंड्यांचा सफेद भाग किंवा एक वाटी साजूक तुपात बनवलेली भाजी आणि एक पराठा

  • दुपारचं जेवण :-

एक बाउल हंगामी भाजी, डाळ, दही, भातासोबत 1 चपाती आणि सॅलेड म्हणून पनीर वा टोफूच्या सॅलेडचा ऑप्शन तिने निवडला होता

  • रात्रीच्या जेवण :-

वेजिटेबल ओट्स सँडविच सह दोन बाउल उकडलेल्या अंड्याचा सफेद भाग खायची.

  • प्री-वर्कआउट :-

एका केळ्यासोबत भिजवलेले बदाम आणि मनुके!

  • पोस्ट-वर्कआउट मील :-

एग व्हाईट किंवा मग प्रोटीन शेक पिणं चांगला पर्याय आहे

  • लो कॅलरी रेसिपी :-

लो फॅट पनीर सह तळलेल्या भाज्या, लिंबूसह स्प्राउट सॅलेड आणि सुकवून भाजलेले बिन्स, नट्स आणि सफरचंदासह लो फॅट असणारे ग्रीट योगर्ट यांचा समावेश केला होता

सिक्रेट वर्कआउट

कॉर्डियो तो वर्कआउट आहे ज्याची निवड प्राथमिक व्यायाम म्हणून मुनमुनने केली. कोणत्याही व्यायामाची सुरुवात करण्याआधी कार्डियो करणे फायद्याचेच असते. हा प्रकार जास्त फॅन्सी नाही पण तुम्हाला ट्रेंड करण्यात मदत करतो. मुनमुन सांगते की तिने आठवड्यातून 6 दिवस स्ट्रेथ ट्रेनिंग सह कॉर्डियो कम्बाईन केले. HIIT मुळे तिला तिचा वर्कआउट स्टॅमिना वाढवण्यास मदत मिळाली. कॉर्डियो हा फॅट लॉसचा एक चांगला पर्याय असला तरी यामुळे स्नायू टोन आणि मजबूत होण्यास देखील मदत मिळते. मुनमुन म्हणते की तुम्ही कोणताही व्यायाम सुरु करा पण त्यात सातत्य ठेवा.

जीवनशैली मध्ये बदल

वजन कमी करण्यासाठी आपल्या सुरु असलेल्या जीवनशैली मध्ये खूप प्रकारचे बदल करावे लागतात. मुनमुनने देखील असेच केले. तिच्या साठी सर्वात मोठा बदल होता शारीरिक रूपाने सक्रीय राहणे. मुनमुन म्हणते की मी माझ्या रिकाम्या वेळेत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपशी चिटकून राहण्यापेक्षा आउटडोर अॅक्टिविटीज वर भर दिला म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीची कोणतीही एक अॅक्टिविटी निवडा आणि याला तुमची सवय बनवा. वजन कमी झाले म्हणजे आता व्यायाम करायची गरज नाही असे समजू नका. उलट आयुष्यभर व्यायाम करा आणि अधिक निरोगी राहा.

वेट लॉस मधून मिळाली प्रेरणा

“कोणतेही ध्येय तुम्हाला जर मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वत:शीच लढावे लागते. जेव्हा तुम्ही स्वत:शीच लढता आणि स्वत:ला अजून एक पाऊल पुढे नेता तेव्हाच तुम्ही यशस्वी होता. वेट लॉस करताना स्वत:ला शारीरिक रूपा पेक्षा मानसिक रूपाने अधिक सक्षम ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर लोटू शकते. म्हणून प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल.” ही गोष्ट आपण वेट लॉस जर्नी मधून शिकलो अशी भावना मुनमुन व्यक्त करते.

NOTE :- या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्ट प्रत्येक व्यक्तीलाच लागू होतील असे नाही. त्यामुळे या लेखात सांगितल्या प्रमाणे आपला वेट लॉस प्लान करावाच असे काही नाही. तुम्ही आहारतज्ज्ञ आणि जाणकारांच्या सल्ल्यानेच स्वत:च्या शरीरासाठी योग्य प्लान बनवून तो फॉलो करावा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here