[ad_1]
त्यामुळे लोकांच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत आहे. तुम्ही देखील करोना लस (corona virus vaccine) घेत असाल आणि कुठेतरी मनात नंतर होणाऱ्या परिणामांची चिंता वाटत असेल तर ती अजिबात करु नका. या परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा आहारात समावेश केल्यास लास घेतल्यावर होणाऱ्या परिणामांमधून तुम्हाला थोडा आराम मिळेल.
जास्त पाणी असणारे पदार्थ (Water Rich Food)
लसीकरण झाल्यावर तुम्ही तुमच्या आहारात जास्त पाणी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. तुम्ही जेवढा असा आहार घ्याल तेवढा तुम्हाला जास्त आराम मिळेल, यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील आणि शरीराचे तापमान व मानसिक स्वास्थ सुद्धा उत्तम राहील. पाणी असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला अधिक जास्त उर्जावान वाटेल. तुम्ही संत्री, आंबे, काकडी यांसारख्या पदार्थांचा यात समावेश करू शकता. हे पदार्थ शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रोव्हिटॅमिन, ए काररॉटेनॉयडस, फॉलेट, मँगनीज आणि व्हिटॅमिन्स असतात. योग्य पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या हिरव्या पालेभाज्या आरोग्य समस्या दूर करून शारीरिक क्रिया उत्तम राखण्यात खूप सहाय्य करतात. पालेभाज्यांच्या सेवनाने थकवा जाणवणार नाही आणि शरीरात उर्जा टिकून राहील. म्हणूनच लस घेतल्यावर आहारात आवर्जून हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. जाणकार सुद्धा हिरव्या पालेभाज्यांचे सेवन लसीकरणानंतर चांगले असल्याचे सांगता.
हळद
हळद हा एक महत्त्वपूर्ण भारतीय मसाला आहे. हळदी शिवाय भारतीय हा आहार एक प्रकारे अपूर्णच आहे. अँटी बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, एनाल्जेसिक आणि अँटी-फंगल गुणांनी समृद्ध असणारी हळद रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षम करते. रोगप्रतिकारक शक्ती जेवढी चांगली तेवढा शरीराला होणारा त्रास कमी. म्हणजेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर तुमचा अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. हळदी मध्ये असलेले Curcuminoids आणि आवश्यक ऑइल हळदी मधील प्रमुख जैविक घटक आहेत जे बॉडी हेल्थ साठी मेडिकल एजंट म्हणून काम करतात. यामुळे हाडे खूप मजबूत होतात.
आले
लसीकरणानंतर थंडी, ताप यांसारखे परिणाम सतावतात आणि तुम्हाला माहित असेलच की सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे सामान्य आजार दूर करण्यासाठी प्राचीन काळापासून आल्याचा वापर केला जात आहे. आयुर्वेदात सुद्धा याचे सेवन करण्याचा सल्ला दिला गेला आहे कारण याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. आल्यामध्ये अँटी बॅक्टीरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडेंट अॅक्टिविटी असतात ज्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तर मदत करतातच पण इम्युन सेल्सना कमजोर होण्यापासून सुद्धा वाचवतात. शक्य असल्यास तुम्ही आल्याचा चहा बनवून आल्याचे सेवन करू शकता. काही लोकं गुळासोबत आले चावून देखील खातात.
मल्टी ग्रेन्स
कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्या पोटाचे आरोग्य आणि पचन तंत्र हेल्दी राखणे गरजेचे आहे. आपल्या उर्जेचा स्तर वाढवण्यासाठी आपल्या डाएट मध्ये लसीकरणानंतर तुम्ही मल्टी ग्रेन्सचा समावेश करू शकता. फायबरच्या सेवनाने पचनतंत्र आणि पोटाचे आरोग्य दोन्ही उत्तम राहते. त्यामुळे आवर्जून मल्टी ग्रेन्सचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा. लसीकरणानंतर तुम्ही जितका चांगला पौष्टिक आहार घ्याल तेवढा शरीरासाठी चांगला असेल. त्यामुळे अधिकाधिक उत्तम आहार घेण्यावर भर द्या.
तुळस
तुळस आपण आहारात समाविष्ट करत नाही, पण लसीकरणानंतर तुळस खाल्ल्याने शरीराला फायदाच होईल. हिंदू धर्मातील घरांत दर महिला दरोरोज तुळशीचे पूजन केल्याशिवाय दिवस सुरु करत नाहीत. हीच तुळस आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. तुळशीच्या पानांत काही विशेष गुण असतात हे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. अनेक संशोधनातून सुद्धा हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की तुळशीच्या पानांचे जर मधासोबत सेवन केले गेले तर रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी मोठ्या प्रमाणावर वाढते.
[ad_2]
Source link