Home मनोरंजन what to eat early morning according to ayurveda: Diet Tips : आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांचे सेवन करणं टाळा, अन्यथा शरीर बनेल आजारांचं घर

what to eat early morning according to ayurveda: Diet Tips : आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांचे सेवन करणं टाळा, अन्यथा शरीर बनेल आजारांचं घर

0

[ad_1]

निरोगी शरीरासाठी हेल्दी आहार किती फायदेशीर आहे हे साऱ्यांनाच ठाउक आहे. पण त्याचबरोबरीने कोणत्या वेळेला कोणते खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजेत, त्याचा शरीरावर काय परिणाम होते याची माहिती असणं देखील गरजेचं आहे. बहुतांश लोक सकाळी रिकाम्या पोटी कोणत्याही खाद्यपदार्थांचे सेवन करतात. नाश्तामध्ये ज्यूस, ब्रेड लोकं आवडीने खातात. पण सकाळी नाश्तामध्ये अशा खाद्यपदार्थांचे सेवन करणं शरीरासाठी योग्य आहे का? याचा विचार देखील तुम्ही केला पाहिजे. आयुर्वेद तज्ञ डॉ. शरद कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार आंबट फळांमध्ये एसिडचा समावेश असतो.

यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. तसचे ब्रेडमुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. यामध्ये गॅस्ट्रीकची समस्या वाढू शकते. मग अशावेळी शरीराल योग्य अशाच खाद्यपदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. तुमच्या निरोगी शरीरासाठी काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सकाळी रिकाम्या पोटी कोणते खाद्यपदार्थांचे सेवन करावे आणि करू नये हे या लेखाच्या आधारे जाणून घेऊया.

​रिकाम्या पोटी पपई खा

निरोगी शरीरासाठी तसेच त्वचेसाठी पपई ही उत्तम मानली जाते. याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर लाभ मिळतात. आतड्यांसंबंधी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पपई हे गुणकारी फळ आहे. वर्षभर पपई बाजारात सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे नियमित नाश्तामध्ये तुम्ही पपईचा समावेश करू शकता. शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पपई फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबरीने यामुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत मिळते. आणि हृदय विकाराचा धोका देखील कमी होतो.

(Blood Sugar Level : जेवणानंतर ब्लड शुगर किती असावी? अशाप्रकारे तपासा रक्तातील साखरेचं प्रमाण)

सकाळी अंड खा

अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या पोषक तत्त्वांमुळे शरीराला भरपूर प्रमाणात लाभ मिळतात. अंड हे सकाळच्या नाश्तासाठी अगदी परफेक्ट आहे. सकाळी अंड खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेलं राहतं. बऱ्याच अभ्यासामधून हे सिद्ध झालं आहे की, सकाळी रिकाम्या पोटी अंड खाल्ल्याने शरीरमधील कॅलरीचे प्रमाण कमी होते. तसेच अंड्यामुळे फॅटचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत मिळते. बऱ्याच लोकांच्या डाएटमध्ये देखील अंड्यांचा समावेश असतो. त्यामुळे तुम्ही देखील रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन करू शकता.

(एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट? यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध!)

पाण्यात भिजवलेले बदाम

व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी एसिडचा समावेश बदामामध्ये असतो. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या बदामाचं सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणं गरजेचं आहे. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला अधिक प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. तसेच बदाम कधीच सालीसकट खाऊ नये हे लक्षात असूद्या. सालीसकट बदाम खाल्ल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोललेले बदाम खा. नियमित बदाम खाल्ल्याने तुमच्या मेंदुला देखील चालना मिळते.

(Yoga For Diabetes : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील ही ‘७’ योगासनं, कधीच वाढणार नाही साखरेची पातळी)

​सुका मेव्यामुळे सुधारेल पचनक्रिया

निरोगी शरीरासाठी नाश्तामध्ये मुठभर सुका मेवा खाणं गरजेचं आहे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते. तसेच पोटामधील पीएच पातळी देखील नियंत्रणात राहते. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही, मणुका, बदाम आणि पिस्ता खाऊ शकता. पण लक्षात ठेवा याचे प्रमाणात सेवन करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा याचे अधिक सेवन केल्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. तसेच वजन देखील वाढू शकतं. त्यामुळे एखादा पदार्थ खाण्याचं विशेष प्रमाण असतं. त्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

(Celeb Weight Loss : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरचं ‘या’ आजारामुळे वाढलं होतं वजन, सांगितली थक्क करणारी वेट लॉस जर्नी)

कलिंगडामुळे मिळतील भरपूर लाभ

सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणं उत्तम मानलं जातं. कलिंगड देखील याच फळांमधील एक फळ आहे. कलिंगडामध्ये ९० टक्के पाण्याचा समावेश असतो. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्याने साखर खाण्याची इच्छा कमी होऊ शकते तसेच कॅलरी कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरू शकतं. तसेच यामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण अधिक असते. हृदय आणि डोळ्यांसाठी हे फळ अधिक फायदेशीर ठरतं.

(White Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना)

सकाळी करा लापशीचे सेवन

कॅलरी कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर लापशी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास देखील मदत मिळते. तसेच निरोगी शरीरासाठी लापशी हा चांगला पर्याय मानला जातो. तसेच याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी लापशीचे सेवन केल्यामुळे दिवसभर पोट भरलेलं राहतं. निरोगी शरीरासाठी उत्तम आणि हेल्दी खाद्यपदार्थांचे सेवन करणं शरीरासाठी नेहमीच उपयुक्त ठरतं.

(Tips for losing belly fat and love handles : कंबरेच्या कडांचे व हिप्सचे वाढलेले फॅट झटक्यात कमी करतात ‘हे’ 7 उपाय, Weight loss सुद्धा होईल!)

​रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांचे सेवन करणं टाळा

टोमॅटोमध्ये पोषक तत्त्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश असतो. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या टॅनिक एसिडमुळे पोटाचे विकार वाढण्याची शक्यता असते. तसेच रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने गॅस्ट्रिक अल्सरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन करणं टाळा. त्याऐवजी रात्री सलाडमध्ये टोमॅटोचा समावेश करा. सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नयेत याकडे विशेष लक्ष असुद्या. अन्यथा अनेक आजारांना तुम्ही निमंत्रण द्याल.

(Weight Loss : सुप्रसिद्ध अभिनेत्रीही लठ्ठपणापासून करू शकली नाही स्वत:चा बचाव, 105 वर पोहचलेल्या वजनाला इतक्या कुल पद्धतीने केलं बाय बाय!)

​दही खाणं टाळा

तुम्ही जेवणामध्ये दहीचा समावेश करत असाल. त्याबरोबरीने केसांसाठी देखील दहीचा वापर करण्यात येतो. मात्र याचे काही दुरुपयोग देखील आहेत. सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं पूर्णपणे टाळा. याचे मुख्य कारण म्हणजे दहीमध्ये लॅक्टिक एसिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे तुमचे पोट खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी-सकाळी दही खाल्ल्याने फार कमी प्रमाणात तुमच्या शरीराला लाभ मिळतात. त्यामुळे सकाळी दहीपासून लांबच राहा.

(Weight Loss Tips : करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्टने सांगितले वजन मोजण्याचे व वेट लॉसचे नैसर्गिक व योग्य मार्ग, चुकीची पद्धत पडू शकते भारी!)

​रिकाम्या पोटी केळ नकोच

केळ्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते. तसेच याचे सेवन केल्यामुळे पोट भरलेलं राहतं. मात्र रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीरासाठी ते नुकसानदायी ठरू शकतं. सकाळी रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने रक्तामधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अनियंत्रित राहते. त्यामुळे सकाळी-सकाळी केळ्याचे सेवन करणं टाळा. तसेच वरील सांगितल्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे सेवन तुम्ही केलात तर शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होईल. तसेच पोट भरलेलं देखील राहिल.

(Weight Loss Story : डाएटमध्ये ‘या’ खास पदार्थांचा समावेश करत तरुणाने काही महिन्यांमध्येच घटवलं तब्बल ३२ Kg वजन)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here