Home मनोरंजन तुम्हाला माहित आहे का? रात्रीच्या वेळी मुलं अधिक का रडतात? यामागे असू शकतात ‘ही’ कारणं

तुम्हाला माहित आहे का? रात्रीच्या वेळी मुलं अधिक का रडतात? यामागे असू शकतात ‘ही’ कारणं

0
तुम्हाला माहित आहे का? रात्रीच्या वेळी मुलं अधिक का रडतात? यामागे असू शकतात ‘ही’ कारणं

शासननामा न्यूज ऑनलाईन

मुलांच्या जन्मानंतर आई-वडिलांची जबाबदारी अधिक वाढते. मुलांचा सांभाळ, त्यांचं संगोपन करण्यातच संपूर्ण दिवस निघून जातो. आपली मुलं आपल्या अवतीभोवती असली की पालकांना देखील एक वेगळाच आनंद मिळतो. मुलांच संगोपन करत असताना पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. मुलांचा सांभाळ कसा करावा, मुलांच्याबाबतीत कोणते निर्णय घ्यावेत, त्यांना काय हवं नको किंवा मुलांना होणारा त्रास कसा ओळखावा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पालक शोधत असतात.

तसेच मुलं रडायला लागली की त्यांना शांत कसं करावं हा पालकांसाठी मोठा टास्कच असतो. बहुतांश मुलं तर रात्रीच्या वेळी अधिक रडतात. रात्रीच्या वेळी मुलं रडण्या मागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. चला तर मग यामागची कारणं आपण या लेखाच्या आधारे जाणून घेऊयात.

​तापमानामधील बदल

सध्या वातावरणामध्ये बरेच बदल घडत आहेत. वाढत्या तापमानामुळे बैचेन होणं ही सामान्य समस्या आहे. पण तुमच्या रुममधील तापमान अधिक गरम किंवा अधिक थंड असेल तर मुलांना याचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी रुममधील वातावर किंवा तापमानात बदल घडत असेल तर मुलं रडू लागतात. ही अगदी सामान्य समस्या असली तरी मुलांना रात्रीची पुरेशी आणि शांत झोप मिळावी म्हणून तुमच्या रुममधील तापमान योग्य असणं गरजेचं आहे. यामुळे मुलांना शांत झोप देखील लागते.

​भीती जाणवणे

मुलांना आपले पालक आपल्या अवतीभोवती असले की त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आई-वडील आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट होत जातं. पालकांनी मुलांना आपल्या जवळ झोपवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलांना शांत झोप लागली की पाळण्यामध्ये ठेवलं जातं. अशावेळी रात्रीच्या अंधारापासून मुलांना भिती जाणवते. तसेच रात्री मुलांना अचानक जाग येत असेल आणि आपले आई-वडील त्यांना समोर दिसले नाहीत की घाबरून मुलं रडायला सुरुवात करू शकतात.

दिवसा झोपणे

मुलांचा सांभाळ करणं ही आईची सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्या आरोग्याकडे लक्ष देत मुलांचे आरोग्य, त्यांचा आहार सगळं काही आईला पाहावं लागतं. मात्र हे सारं करत असताना मुलांना चांगल्या सवयी लावणं देखील गरजेचं आहे. काही मुलं दिवसा अधिक प्रमाणात झोपतात. दिवसा पुरेशी झोप मिळाल्यामुळे रात्री मुलांना जाग येऊ शकते. रात्रीच्या वेळी एकदा जाग आल्यावर पुन्हा झोपणं मुलांना शक्य होत नसेल तर ती रडू लागतात.

भूख लागणे

रात्री मुलं रडण्याचं मोठं कारण म्हणजे मुलांना भूख लागणे. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आईचं दूध हाच मुलांचा योग्य आणि पौष्टिक आहार असतो. आईच्या दूधामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच. पण त्याचबरोबरीने मुलांच्या शरीराला पोषक घटकांचा देखील पुरवठा होतो. रात्री भूख लागली की मुलांना जाग येते. मग अशावेळी मुलं अधिक रडू लागतात. रात्री मुलांची रडण्यामागील कारणं अगदी वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता त्यांना शांत करणं गरजेचं आहे.

​वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे

पालकांसाठी सुरुवातीच्या दिवसांमध्ये सारं काही नवीन असतं. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये मुलांना काय हवं नको ते ओळखणं हा पालकांसाठी मोठा टास्क असतो. बऱ्याचदा वेदना किंवा अस्वस्थता वाटत असेल तर मुलं बोलू शकत नाहीत. पोट दुखी होत असेल तर मुलं रडू लागतात. त्यांच्या सवयी ओळखून किंवा अधिक काळ मुलं रडत असतील तर त्यामागे पोट दुखी किंवा अस्वस्थता हे कारण असू शकतं. वेदना अधिक असतील तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही मुलांना शांत करू शकता.

​मुलांना पुरेशी झोप कशी मिळेल?

मुलांच्या जन्मानंतर दोन महिने रात्री मुलांना अधिक भूख लागते. म्हणूनच मुलांना रात्री सारखी जाग येऊ शकते. दोन महिन्यांच्या मुलांना रात्री तीन-तीन तासांनी दूध पाजावं लागतं. पण मुलं जेव्हा चार महिन्यांची होतात तेव्हा त्यांना रात्री फक्त एकदाच दूध द्यावं लागतं. चार महिन्यांनंतर रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध पाजलं की त्यांना पुन्हा भूख लागत नाही. मुलं सहा महिन्यांची झाल्यानंतर रात्री त्यांना पुरेशी झोप मिळू लागते. एका अभ्यासानुसार ९० टक्के मुलांना सहा महिन्यांनंतर रात्रीची पुरेशी झोप मिळते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here