
[ad_1]
दरम्यान जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत यामी व आदित्यने अतिशय साधेपणात लग्न केलं. यामीने लग्नसोहळ्यात स्वतःचा लुक साधा व मोहक ठेवण्यावरच भर दिल्याचे दिसतंय. मोठ्या पडद्यावर तसंच सर्वसामान्य आयुष्यात दिसणाऱ्या नववधूंच्या तुलनेत यामी गौतमचे रूप मोहक, हटके व सुंदर दिसत आहे. (सर्व फोटोंचे क्रेडिट : इंस्टाग्राम@yamigautam)
(शाहरुखची लाडकी लेक बोल्ड ड्रेस घालून पोहोचली पार्टीत, सुहानाचा हॉट लुक सर्वांवर पडला भारी)
लाल रंगाची साडी आणि ओढणी

यामीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये लाल रंगाची साडी नेसल्याचे आपण पाहू शकता. ही साडी जॉर्जेट फॅब्रिकपासून तयार करण्यात आली होती. या पारंपरिक पद्धतीच्या साडीवर चंदेरी रंगाच्या जरीने सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलंय. तिनं डोक्यावर घेतलेल्या ओढणीवर सोनेरी रंगाच्या एम्ब्रॉयडरीसह सीक्वन्स डिझाइन जोडण्यात आले होते. अभिनेत्रीच्या हातामध्ये पारंपरिक लाल रंगाच्या बांगड्या, पायांमध्ये चांदीचे पैजण आणि जोडवी असे दागिनेही दिसताहेत. महत्त्वाचे म्हणजे यामीचा चेहरा पूर्णतः मेकअप – फ्री दिसत होता.
नथीने वेधून घेतलं लक्ष

यामीने लाल रंगाच्या साडीवर मॅचिंग ब्लाउज घातलं होतं. ब्लाउजवरही जरी वर्क आपण पाहू शकता. तिच्या ब्लाउजचे डिझाइन सुद्धा अतिशय साधेच होते. हाफ स्लीव्ह्जच्या ब्लाउजमध्ये गळ्याचे डिझाइन गोल आकारात होतं. हातामध्ये घातलेल्या बांगड्यांसह आकर्षक कलीरे सुद्धा दिसताहेत. विशेष म्हणजे तिनं घातलेल्या मोठ्या नथीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. हा एक पारंपरिक दागिना आहे. दरम्यान तिच्या कानातील दागिना अतिशय साधा व छोट्या आकारातील होता.
(अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल)
मेंदीसाठी घातला होता सिल्क पॅटर्नमधील ड्रेस

यामी गौतमने मेंदी सोहळ्यासाठी केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. बुटी प्रिंट डिझाइनमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. यामधील नेट फॅब्रिकच्या ओढणीवर सिक्वेन्ड आणि गोटा वर्क सुद्धा जोडण्यात आलं होतं. यामीने ड्रेसवर सोनेरी व मरून रंगसंगतीचे चोकर नेकलेस आणि मॅचिंग ईअररिंग्स घातले होते.
(आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल)
हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस

यामी गौतमने हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सिल्क फॅब्रिक असलेल्या ड्रेसच्या स्लीव्ह्जवर प्लीट्स डिझाइन आपण पाहू शकता. कलरब्लॉक इफेक्ट मिळावा यासाठी अभिनेत्रीनं लाल रंगाची ओढणी मॅच केली होती. ड्रेसवर तिनं कवड्यांपासून तयार करण्यात आलेले दागिने घातले होते. दागिन्यांमधील हा ट्रेंड सध्या जोमात आहे.
(मोहिनी!माधुरी दीक्षितचा लाल रंगाच्या साडीतील मादक लुक, फोटो पाहून म्हणाल ‘हिची अदा करी फिदा’)
लग्नासाठी लाल रंगाच्या साडीची केली निवड

यामीने लग्नसोहळ्यासाठी वजनदार डिझाइनर लेहंग्याऐवजी लाल रंगाची सिल्क पॅटर्नमधील साडीची निवड केली होती. साडीवर गोल्डन वर्क करण्यात आलं होतं. तिने परिधान केलेल्या ब्लाउजवर फ्लोरल मोटिफ्स डिझाइनही आपण पाहू शकता. डोक्यावर घेतलेल्या ओढणीवरही सुंदर व आकर्षक डिझाइन दिसत आहे. यामीने ट्रेंडी ज्वेलरीऐवजी पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती. तिच्या हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्यासह कलीरे दिसताहेत. नववधू यामी गौतमच्या मोहक व साध्या लुकने तिच्या चाहत्यांचं हृदय पुन्हा एकदा जिंकलंय.
(माधुरी दीक्षितने ओढणी वाऱ्यावर उडवत दिली मादक पोझ, चाहते म्हणाले ‘सौंदर्याची देवी’)
[ad_2]
Source link