[ad_1]
अगदी साध्या पद्धतीने यामीने लग्न केलं. लग्नासाठी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला. लग्नातील तिच्या लुकची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. यामीच्या मंगळसुत्राने तर साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सासरच्या मंडळींकडून यामीला हिऱ्यांनी सजलेलं महागडं मंगळसुत्र मिळालं. तिच्या या मंगळसुत्राची डिझाइन आजच्या मॉडर्न नववधूसाठी देखील अगदी परफेक्ट आहे.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स, इन्स्टाग्राम@yamigautam)
सुंदर आणि आकर्षक मंगळसुत्र
यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. या सेलिब्रिटी विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. यामीचा नववधू लुक तर कमालीचा होता. यामध्ये तिचं मंगळसुत्र विशेष लक्षवेधी ठरलं. वरील दिलेल्या फोटोमध्ये यामीचं मंगळसुत्र तुम्ही पाहू शकता. शॉर्ट लेन्थचं हे मंगळसुत्र यामीवर अगदी खुलून दिसत आहे. काळे मणी, सोन्याच्या मोत्यांनी तयार करण्यात आलेल्या या मंगळसुत्रामध्ये चमकदार हिरे तुम्हाला दिसतील. मंगळसुत्राला खरं तर मॉडर्न टच देण्यात आला आहे. पारंपरिक तसेच वेस्टर्न आउटफिटवर तुम्ही अशाप्रकारच्या डिझाइनचं मंगळसुत्र घालू शकता.
(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)
इयररिंग्य होते खास
लग्नात आपला लुक अगदी परफेक्ट असावा अशी प्रत्येक नववधूची इच्छा असते. सेलिब्रिटी नववधूंचा लुक अनेक मुली फॉलो करतात. यामीचा देखील तिच्या लग्नातील लुक प्रत्येक नववधूसाठी परफेक्ट आहे. मंगळसुत्राबरोबरच यामीने घातलेले कानातले देखील तितकेच खास होते. यामीने लग्नामध्ये देजाहूर झुमके घातले होते. लग्नामध्ये क्वचितच एखादी नववधू अशाप्रकारचे कानातले घालताना तुम्ही पाहिलं असेल. पण यामीने आपण उठून दिसावं म्हणून या कानातल्यांची निवड केली होती. युनिक लुकसाठी तुम्ही देखील कानातल्यांची ही डिझाइन फॉलो करू शकता.
(अॅनिमल प्रिंट बिकिनीमधील बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट व बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)
दीपिका पदुकोणचं परफेक्ट मंगळसुत्र
दीपिका पदुकोणच्या मंगळसुत्राची देखील सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर याच अभिनेत्री सारखं आपलं मंगळसुत्र असावं असा प्रत्येक मुलीचा अट्टाहास असतो. दीपिकाचं हे मंळसुत्रं काळ्या रंगाच्या आणि सोन्याच्या मोत्यांनी तयार करण्यात आलं होतं. तसेच मंगळसुत्राच्या मध्यभागी डायमंड पेंडेंट होतं. वरील फोटोमध्ये दीपिकाने हे मंगळसुत्र वेस्टर्न आउटफिटवर घातलेलं तुम्हाला दिसेल. दीपिकाच्या लग्नानंतर या मंगळसुत्राची डिझाइन चांगलीच चर्चेत आली होती. तुम्ही देखील ही डिझाइन फॉलो करू शकता.
अनुष्का शर्माचं मोठ मंगळसुत्र
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा शाही विवाहसोहळा तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या लग्नातले फोटो पाहून तर नेटकरी थक्क झाले होते. अनुष्का-विराटचा विवाहसोहळा लक्षात राहणारा होता. अनुष्काने छोटं मंगळसुत्र परिधान न करता मोठं मंगळसुत्र घालण्याकडे अधिक लक्ष दिलं. तुम्हाला या फोटोमध्ये तिचं मोठं मंगळसुत्र स्पष्ट दिसेल. टू-स्ट्रिंग्स असलेल्या या मंगळसुत्रामध्ये सोनेरी आणि काळ्या रंगाचे मणी आहेत. तसेच फुलांच्या आकाराचं छोटं पेंडेट देखील या मंगळसुत्रामध्ये आहे. पारंपरिक पोषाखावर अशा प्रकारच्या डिझाइनचं मंगळसुत्र अगदी उठून दिसतं.
(दिवसरात्र पार्टी चाले! करीना व करिश्माच्या स्टायलिश लुकवर भारी पडली कपूर घराण्याची ‘ही’ लाडकी लेक)
डायमंड प्रेमींसाठी उत्तम डिझाइन
बहुतांश स्त्रियांना आपलं मंगळसुत्र इतरांपेक्षा युनिक असावं असं वाटतं. त्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या डिझाइनचे मंगळसुत्र घालण्याकडे अधिक भर देतात. पण मंगळसुत्रामध्ये डायमंड असणं तुम्हाला आवडत असेल तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या मंगळसुत्राची डिझाइन तुम्ही फॉलो करू शकता. लग्नादरम्यान ऐश्वर्याचं मंगळसुत्र मोठं आणि हेवी देखील होतं. पण लग्नानंतर तिने छोटं आणि सिंगल स्ट्रिंगचं मंगळसुत्र घालणं पसंत केलं. तिच्या मंगळसुत्रामध्ये तीन डायमंड पेंडेंट तुम्ही पाहू शकता. तुम्ही देखील अशाप्रकारचं मंगळसुत्र नेहमीच्या वापरासाठी बनवू शकता.
हटके डिझाइन
बी-टाउनमधील अभिनेत्रींच्या मंगळसुत्राच्या डिझाइनमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री सोनम कपूरच्या मंगळसुत्राची. सोनमचं मंगळसुत्र इतर मंगळसुत्रांच्या डिझाइनपेक्षा काहीसं हटके आणि वेगळं आहे. या मंगळसुत्रामध्ये तुम्हाला हिऱ्यांचे पेंडेंट दिसेल. तसेच हे मंगळसुत्र ब्रेसलेट म्हणून घालता यावं हे लक्षात ठेवून या मंगळसुत्राची डिझाइन तयार करण्यात आली होती. सोनमने अगदी हटके पद्धतीचं डिझाइन पसंत करण्याकडे अधिक भर दिला होता. सोनम आणि आनंद आहुजाचा विवाहसोहळ बरेच दिवस चर्चेत देखील होता.
[ad_2]
Source link