Home मनोरंजन yoga and exercise for weight loss and belly fat: करीनाच्या डाएटीशियनने इम्यूनिटी बूस्टिंगसाठी सांगितली महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध फळ खाण्याची योग्य पद्धत! – kareena kapoor dietitian explains how jackfruit seeds are beneficial for boosting immunity and health of stomach in marathi

yoga and exercise for weight loss and belly fat: करीनाच्या डाएटीशियनने इम्यूनिटी बूस्टिंगसाठी सांगितली महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध फळ खाण्याची योग्य पद्धत! – kareena kapoor dietitian explains how jackfruit seeds are beneficial for boosting immunity and health of stomach in marathi

0
yoga and exercise for weight loss and belly fat: करीनाच्या डाएटीशियनने इम्यूनिटी बूस्टिंगसाठी सांगितली महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध फळ खाण्याची योग्य पद्धत! – kareena kapoor dietitian explains how jackfruit seeds are beneficial for boosting immunity and health of stomach in marathi

[ad_1]

कोरोना विषाणूची दुसरी लाट टाळण्यासाठी प्रत्येकजण या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोक त्यांच्या आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी फळे आणि हेल्दी ड्रिंक्स घेत आहेत तर बरेच लोक घरगुती उपचारांद्वारे रोगप्रतिकार शक्ती वाढवत आहेत. आपणास माहित आहे की आपले शरीर नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रतिक्रियेसह (Natural immune response) जन्माला येते, बहुतेकदा त्याला जन्मजात रोगप्रतिकारक शक्ती (Innate immunity) म्हणतात. रोगप्रतिकारक शक्तीमुळेच आपण सर्व प्रकारच्या हानिकारक जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध लढण्यास सक्षम आहोत.

कोरोनामध्ये आम्हाला आणि तुम्हाला केवळ शरीरात असलेल्या प्रतिरक्षा प्रणालीची शक्तीची ओळखच झाली नाही तर त्याचे महत्त्व देखील चांगले ठाऊक झाले आहे. म्हणूनच आपण ते सर्व प्रकारे मजबूत केले पाहिजे. देशातील नामांकित पोषण तज्ञांनीही लोकांना हेच सुचवले आहे की आता आपण आपला पारंपारिक आहार जीवनशैलीत अवलंबला पाहिजे. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टने अलीकडेच फणसाच्या बियांवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने सांगितले आहे की जुन्या काळात लोक अशा प्रकारचे हेल्दी पदार्थ कसे खायचे, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होती.

विदेशी फूड आइटम्ससाठी इम्यूनिटीसोबत होतीये तडजोड

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो. जसं नट्स, फ्रुट्स, हिरव्या भाज्या आणि काही हेल्दी ड्रिंक्स. सेलिब्रिटी डाएटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर म्हणतात की गेल्या दोन दशकांत आपण आपल्या आहाराकडे फारसे लक्ष दिले नाही. बरीच लोक आता हेल्दी हंगामी पदार्थ शिजवण्याऐवजी विदेशी खाद्यपदार्थ आणि बेकिंग व्हिडिओ पाहण्यात आपला वेळ घालवतात. असे करुन आपण कुठेतरी आपल्या आरोग्याशी तडजोड करत आहोत आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे देखील त्यापैकीच एक आहे. आपण रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित असे बरेच पदार्थ विसरलो आहोत. खर्‍या अर्थाने आपण पारंपारिक खाद्यपदार्थांविषयी देखील आपल्याला जागरूक असणे आवश्यक आहे जे आपल्यासाठी अनेक प्रकारे आरोग्यदायी असतात.

(वाचा :- Yoga For hypertension: हाय बीपीच्या लोकांनी रोज सकाळी करावीत ‘ही’ ५ योगासने, दीर्घायुषी व्हाल!)

पारंपारिक पदार्थांसोबतच जिंकू शकतो करोनाची लढाई

न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की चांगली गोष्ट म्हणजे आता ही प्रक्रिया बदलली जाऊ शकते. कोरोना कालावधीत आपण पुन्हा एकदा आपल्या मुळाशी संपर्क साधला पाहिजे अर्थात पारंपारिक अन्नाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवण्यावर भर दिला पाहिजे. त्या म्हणतात की काही लोकांना हा प्रवास आव्हानात्मक वाटू शकेल परंतु तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण अशाप्रकारे आपण आपली जन्मजात रोगप्रतिकारशक्ती बळकट करू शकतो. जेव्हा आपण दररोज नियमितपणे आपला साधा आहार घेता तेव्हा आरोग्यास फायदे देखील होतात. अलीकडील पोस्टमध्ये ऋजुता दिवाकर यांनी काही जुन्या खाद्यपदार्थांचा उल्लेख केला आहे ज्याद्वारे आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतो.

(वाचा :- करोनाच्या तिस-या लाटेचा लठ्ठ लोकांना सर्वाधिक धोका, आयुर्वेदिक डॉक्टरांनी बचावासाठी दिले ७ उपाय!)

डाएटिशियनने फणसाच्या बिया इम्यूनिटी बुस्टिंगसाठी सांगितल्या रामबाण!

फणसाच्या बिया

ऋजुताने लोकांना एका खास पारंपारिक खाद्यपदार्थाची ओळख करुन दिली आहे ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तिने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर लिहिले आहे की मी तुम्हाला एका पदार्थाबद्दल सांगत आहे ज्याला फणसाच्या बिया किंवा जॅकफ्रूट सीड्स म्हणून ओळखले जाते. या बियांची भाजी किंवा करी बनवली जाऊ शकते आणि भातासह खाऊ शकतो. आपण या बिया भाजून किंवा वाफवून त्यावर मीठ आणि मिरपूड घालून एक हेल्दी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

(वाचा :- सांधेदुखी व गुडघेदुखीने ग्रासलेल्या लोकांना भाग्यश्रीने सांगितल्या ४ एक्सरसाइज, राहाल ५०शी नंतरही फिट!)

फणसातील पोषक तत्व

फणसाच्या बिया पोटॅशियम, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. 3.5 औंसमध्ये 7 ग्रॅम प्रथिने, 38 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 1.5 ग्रॅम फायबर असते. याशिवाय फणसाच्या बिया झिंक, जीवनसत्त्वे आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. ते केवळ आपल्या आहारात नवीनपणा आणत नाहीत तर त्यांचे सेवन आपल्या उतींचे (tissues) सामर्थ्य देखील वाढवतात.

(वाचा :- रोज सकाळी ‘या’ पद्धतीने बनवलेल्या आयुर्वेदिक चहाचं करा सेवन, वेट लॉस व आजारांवर आहे रामबाण!)

फणसाच्या बियांचे फायदे

फणसाच्या बिया केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीच प्रभावी नाहीत तर त्याशिवाय त्याचे अनेक आरोग्यदायक फायदे देखील आहेत.

  1. फणसाच्या बियांमधील फ्लेव्होनॉइड घटक देखील कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. वैज्ञानिक अभ्यासानुसार बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून एचडीएल (HDL) म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात हे मदत करू शकते.
  2. लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या अॅनिमीयाची समस्या टाळण्यासाठी फणसाच्या बिया खाणं उपयुक्त ठरू शकतं.
  3. फणसाच्या बिया त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. ते थायमिन आणि राइबोफ्लेविन सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात. हे दोन्ही जीवनसत्त्वे त्वचेसाठी आवश्यक मानले जातात. या आधारावर, संशोधनात असे म्हटले आहे की फणसाच्या बियांच्या फायद्यांमध्ये त्वचा निरोगी करणे देखील समाविष्ट आहे
  4. संशोधनानुसार फणसाच्या बियांमधील फायबर आपल्या पचन तंत्राला निरोगी ठेवण्यास लाभदायक ठरू शकते
  5. फणसाच्या बियांचे सेवन करून कर्करोगाचा धोकाही टाळता येतो
  6. याच्या सेवनामुळे अतिसाराच्या समस्येपासूनही मुक्ती मिळते

(वाचा :- घरचे ‘हे’ सात्विक पदार्थ खाऊन तरुणीने घटवलं तब्बल ५० किलो वजन, आजारामुळे बिघडली होती फिगर!)



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here