Monday, June 21, 2021
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रEknath Khadse भाजपमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे: खडसे...

Eknath Khadse भाजपमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे: खडसे | Shasannama News

मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

‘भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे. थोडे दिवस थांबा. आपलं सरकार येणार आहे असं आमदारांना सांगून भाजपचे नेते दिवस काढत आहेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला हाणला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कार्यक्रम योग्य वेळी करू, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अधूनमधून करत असतात. फडणवीसांच्या या वक्तव्याची खडसे यांनी खिल्ली उडवली. ‘भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं. त्यामुळं ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात. ही नाराजी वाढू नये म्हणून सरकार पडण्याची वक्तव्ये केली जात असतील,’ असं खडसे म्हणाले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

वाचा: ‘णे, नाशिक अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, जाणूण घ्या नियमावली काय सुरू काय बंद

‘फडणवीस हे आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी अस्वस्थतेतूनच अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. मात्र, काहीही होत नाही. उलट दिवसेंदिवस हे सरकार मजबूत होत आहे. विरोधक वाट बघत आहे आणि ते वाटच बघत राहतील,’ असा दावा खडसे यांनी केला.

फडणवीस पहिल्यांदाच घरी आलेले नाहीत!

देवेंद्र फडणवीस हे माझ्या जळगावातील घरी अनेकदा आले आहेत. मी विरोधी पक्षनेता असताना फडणवीस हे माझ्याकडं १२ ते १८ तास असायचे. जेवायचे आणि कधी-कधी झोपायचे देखील. मुंबईतील माझ्या ‘बी ४’ बंगल्यावर ते अनेकदा असायचे. मुख्यमंत्री म्हणूनही ते जळगावला मुक्ताईनगरमध्ये आले होते. सूतगिरणीचं आणि साखर कारखान्याचं उद्घाटन केलं होतं,’ असं खडसे यांनी सांगितलं.

वाचा: महाराष्ट्र आजपासून अनलॉक, पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

Source link

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Eknath Khadse भाजपमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे: खडसे | Shasannama News 'ट्विटरवरील 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या' - शासननामा न्यूज - Shasannama News

    […] Eknath Khadse भाजपमध्ये किती अस्वस्थता आहे हे … […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW