Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रmaratha reservation latest update: Ashok Chavan मराठा आरक्षण: 'केंद्र सरकार कमी पडले...

maratha reservation latest update: Ashok Chavan मराठा आरक्षण: ‘केंद्र सरकार कमी पडले असा आरोप आम्ही करणार नाही’ – maratha reservation ashok chavan crestfallen over sc decision


हायलाइट्स:

  • घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राकडेच.
  • केंद्राची याचिका फेटाळल्यानंतर अशोक चव्हाण बोलले.
  • मराठा आरक्षणासाठी आता केंद्राने निर्णय घ्यावा.

मुंबई: संसदेच्या १०२ व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे. या घटना दुरुस्ती नंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करणे आवश्यक झाले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ( Ashok Chavan On Supreme Court Decision )

वाचा:मराठा आरक्षणाच्या प्रयत्नांना धक्का; केंद्राची फेरविचार याचिका फेटाळली

मराठा आरक्षणावर विरोधकांनी कितीही राजकारण केले असले तरी आम्ही या विषयावर राजकारण करणार नाही. पुनर्विलोकन याचिका करताना केंद्र सरकार कमी पडले, असा राजकीय आरोप आम्ही करणार नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे बाजू मांडून केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरुस्ती केली पाहिजे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे, असेही अशोक चव्हाण यांनी पुढे नमूद केले.

वाचा: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली; फडणवीस यांचे राज्य सरकारला ‘हे’ आवाहन

सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

मराठा आरक्षणावर ५ मे रोजी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने बहुमताने, सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचे स्पष्ट केले होते. १०२व्या घटनादुरुस्तीने राज्यांना असलेला हा अधिकार उरला नसल्याचेही घटनापीठाने नमूद केले होते. त्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात ‘फेरविचार याचिका ज्या आधारावर दाखल करण्यात आली आहे तिचा मर्यादित विचार करता येणार नाही,’ असे न्या. भूषण यांनी नमूद केले. ज्या आधारांवर याचिका दाखल करण्यात आली आहे तिचा विचार मुख्य निकालात करण्यात आला आहे. त्यामुळे या फेरविचार याचिकेची दखल घेण्यासाठी पुरेसा आधार नाही, असे मत अन्य चार न्यायमूर्तींनी नोंदवले. त्यानंतर खंडपीठाने ही याचिका फेटाळली. यासोबतच यावर खुली सुनावणी घेण्याची विनंती करणारी केंद्र सरकारची याचिकाही खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

वाचा: करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवरSource link

maratha reservation latest update: Ashok Chavan मराठा आरक्षण: 'केंद्र सरकार कमी पडले असा आरोप आम्ही करणार नाही' - maratha reservation ashok chavan crestfallen over sc decision
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News