Monday, June 21, 2021
Homeपुणेलग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना | Crime

लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना | Crime

पुणे, 07 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या विवाहितेनं आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत (demand money to buy alcohol) म्हणून आरोपी पती तिला नेहमी त्रास देत होता. आरोपी पतीच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन स्वतः ला संपवलं आहे. ही घटना 4 जून रोजी पुण्यातील लष्कर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

स्वाती रोहित पवार असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून त्या पुण्यातील लष्कर परिसरात आपल्या पतीसोबत वास्तव्याला होता. आरोपी पती रोहित राजू पवारला दारुचं व्यसन होतं. दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या हाताला नोकरी किंवा रोजगारही नव्हता. त्यामुळे दारूची तहान भागवण्यासाठी राजू आपल्या पत्नीला नेहमी त्रास देत होता. पत्नीने दारुसाठी माहेरच्यांकडून पैसे आणावेत म्हणून पती मृत स्वातीचा नेहमी छळ करत होता. अनेकदा तिला शिवीगाळ आणि मारझोडही करायचा.

हे ही वाचा- ट्विटरवरील ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या’

त्यामुळे मद्यपी पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून मृत स्वाती यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी निर्मला मिसाळ यांनी विवाहितेला आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीसह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत स्वातीचा अवघ्या एक वर्षापूर्वी आरोपी पती रोहितसोबत विवाह झाला होता. संसराचा गाडा सुरूही झाला नव्हता तोपर्यंत पीडित पत्नीने स्वतःला संपवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Source link

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना | Crime म्युकर मायकोसिस संसर्ग रोखण्यासाठी अमरावतीत नवा पॅटर्न - शासननामा न्यूज - Shasannama News

    […] […]

  2. लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना | Crime अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल

    […] […]

  3. लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना | Crime डिलिव्हरीनंतर 'हे' उपाय करून राहा स्लिम फिट, काही दिवसांमध्येच होईल वेट लॉस - शासननामा न्यूज - Sh

    […] […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW