राज्य सरकारची MPSC मार्फत लवकरच 15,500 पदांसाठी मेगाभरती होणार

0
26

मुंबई : राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील सध्या ऐरणीवर आहे. अशातच आता राज्य सरकारने एमपीएससी परीक्षांबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एमपीएससी मार्फत लवकरच 15,511 पदांसाठी मेगा भरती होणार असल्याची माहिती दिली आहे.

यामध्ये गट ‘अ’ ते गट ‘क’ पर्यंतच्या पदांचा समावेश असेल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.

“एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत,” असं मेगा भरतीविषयी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले. तसेच, एमपीएससीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देश देखील देण्यात आल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.