Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाMinistry Of Health Has Given The Guidelines That Vaccine Can Be Given...

Ministry Of Health Has Given The Guidelines That Vaccine Can Be Given To Pregnant Women: DG, ICMR


नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढला आहे. दरम्यान, तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तविली आहे त्यामुळे देशात सध्या चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत  अनेक संभ्रम लोकांच्या मनात आहेत. परंतु ICMR ने हे संभ्रम दूर केले असून गर्भवती महिलांना कोरोना लस दिली जाऊ शकते, असे सांगितले आहे. 

ICMR डीजी बलराम भार्गव म्हणाले, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईनुसार गर्भवती महिलांना लस दिली जाऊ शकते. लसीकरण गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून त्यांनी ते करावे. आम्ही 2 ते 18 वर्षाच्या मुलांवर अभ्यास सुरू केला आहे. त्याचा अहवाला संप्टेबरपर्यंत आमच्याकडे येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुलांच्या लसीकरणाबद्दल डाटा नाही.  त्यामुळे  लहान मुलांना या लसीची आवश्यकता आहे का? हा देखील एक प्रश्न आहे. 

अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. या ट्वीटसोबत सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे.  

Covovax लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती. 

संबंधित बातम्या :

Covovax Vaccine: कोवोवॅक्स लसीचं उत्पादन सुरु, पहिल्या बॅचच्या निर्मितीला सुरुवात, Serumकडून ट्वीट 

Maharashtra Unlock : संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू, नवी नियमावली जारी 

Source link

Ministry Of Health Has Given The Guidelines That Vaccine Can Be Given To Pregnant Women: DG, ICMR
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News