मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक

0
22
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूतने (Mira Rajput) एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘गर्भावस्था एक सुंदर प्रवास आहे, जो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुरू करता. यादरम्यान प्रत्येक वळणावर जोडीदाराची सोबत खरोखर महत्त्वाची असते. दोन्ही प्रेग्नेंसीदरम्यान शाहिद एक परफेक्ट जोडीदार असल्याचे सिद्ध झाले, त्यानं मला प्रत्येक क्षण शांत आणि आनंदी ठेवण्यास मदत केली’. मीरा राजपूतने गर्भावस्थेतील प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवला आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान तर तिचा स्टायलिश अवतार देखील पाहायला मिळाला.

दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान बहुतांश महिला सैल ए लाइन ड्रेस, टी-शर्ट, फ्रेम्पी गाउन आणि बॅगी टॉप्स परिधान करताना दिसतात. पण मीराने मिनी प्लेसूटपासून ते फ्रंट-टाई शर्ट ड्रेसपर्यंत, सर्वच प्रकारचे स्टायलिश कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान बेबी बंप लपवण्यासाठी तिनं सैल कपडे घालवण्यावरच भर दिल्याचंही दिसलं. याद्वारे तिनं कम्फर्ट आणि स्टाइलची पुरेपूर काळजी घेतली होती. तिचा असाचा काहीसा लुक अंबानींच्या पार्टीमध्येही पाहायला मिळाला होता. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स/योगेन शाह)

​मीरा राजपूरचा स्टायलिश लुक

मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या साखरपुड्याची पार्टी २०१८मध्ये जल्लोषात पार पडली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील कित्येक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मीरा राजपूत देखील पती शाहिद कपूरसोबत या पार्टीमध्ये पोहोचली होती. शाहिदनं टेक्श्चर्ड प्रिंट असणारे काळ्या रंगाचे पँट-सूट परिधान केलं होतं. तर मीराने वजनदार एम्ब्रॉयडरी असणारा शरारा सेटची निवड केली होती. या पोषाखामुळे मीराला बेबी बंप लपवण्यास मदत मिळाली होती. तसंच तिचा लुक प्रचंड स्टायलिश सुद्धा वाटत होता.

​मनीष मल्होत्रानं डिझाइन केला होता ड्रेस

मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक

मीरा राजपूतने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला पेस्टल शेडचा शरारा परिधान केला होता. यामध्ये कुर्त्यासह मॅचिंग शरारा व ओढणीचा समावेश होता. कुर्त्याचा रंग फिकट गुलाबी होता, यामध्ये हातावर बारीक स्वरुपातील एम्ब्रॉयडरी आपण पाहू शकता. सिल्क फ्लॉस, शिफॉन आणि क्रेप यासारख्या फॅब्रिकपासून हे आउटफिट तयार करण्यात आलं होतं. कुर्त्यामध्ये स्कूप नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्ज डिझाइन जोडण्यात आलं होतं. ड्रेसला आकर्षक लुक मिळावा यासाठी थ्री-डी एम्बेलिश्मेंटचा वापर करण्यात आला होता.

​क्लासी डिझाइनिंग

मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक

मीराने परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये गोल्डन ग्लास बीड्स आणि रेशीमच्या धाग्यांनी वर्क करण्यात आलं होतं. यामध्ये फुल-पानांच्या डिझाइन सीक्वन-जरी वर्कसह स्टेटमेंट लुक देण्यात आला होता. कुर्त्याची हेमलाइन ए-लाइन पॅटर्नमधील होती. कुर्त्यासह सैल फिटिंगचा शरारा लुक मॅच करण्यात आला होता. यामध्ये सुंदर ओढणीचाही समावेश होता. या कपड्यांमध्ये मीराचा लुक स्टायलिश व सुंदर दिसत होता.

​परफेक्ट स्टायलिंग

मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक

मॅटरनिटी लुक परफेक्ट दिसावा यासाठी मीरा राजपूतने वजनदार ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी परिधान करणं टाळलं होतं. तिनं कानात केवळ डायमंडचे स्टड्स घातले होते. मीराने केसांना सॉफ्ट कर्ल्स लुक दिला होता. तसंच स्मोकी आइज, गुलाबी रंगाचे लिपस्टिक आणि ब्लश्ड चीक्स अशा स्वरुपातील मेकअपमुळे तिला परफेक्ट लुक मिळाला होता.

स्टायलिश आउटफिटवर केवळ ईअररिंग्ज मॅच करून मीरा राजपूतने मॉडर्न लुक कॅरी केल्याचं पाहायला मिळालं.

Source link