Tuesday, June 22, 2021
HomeपुणेMonsoon Update: 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती |...

Monsoon Update: 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती | National


Monsoon Update: 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

Monsoon Update: अरबी समुद्राच्या (Arabian Sea) पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेतचं ठाण मांडून बसले होते. पण आता मान्सूनच्या आगमनासाठी (Monsoon) पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे, 02 जून: सध्या अरबी समुद्राच्या (Arabian Sea) पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेतच ठाण मांडून बसले होते. पण सध्या मान्सूनच्या आगमनासाठी (Monsoon) पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत केरळात मान्सून (in next 24 hours Monsoon will arrive in Kerala) दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकुल बदल होऊन केरळात ढगाळ वातावरण तयार झालं आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा (Pre monsoon rain) तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट घोंघावत आहे. आज दुपारपासूनचं पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाण्यालाही हवामान खात्याचा इशारा

मुंबई आणि ठाणे परिसरातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. याठिकाणी आज पाऊस कोसळणार की नाही? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काल मुंबईसह ठाणे परिसरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांची पुरती धांदल उडाली होती.

हे ही वाचा- Monsoon Update: यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

यंदा देशात 101 टक्के मान्सून बरसणार

मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जारी केला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार, यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यावर्षी देशात दुष्काळ पडण्याची शक्यता खूप कमी असून ती केवळ 8 टक्के एवढीच आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 2, 2021, 4:02 PM ISTSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW