धनगर ST आरक्षणासाठी खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांचे ढोल बजाओ आंदोलन

0
188

मुंबई (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

महाराष्ट्रातील धनगर ST आरक्षणाचा मुद्दा गेली ७० वर्षांपासून प्रलंबित आहे. केवळ ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ लिहिल्या गेल्यामुळे धनगर जमात ST आरक्षणापासून वंचित राहिली आहे. दऱ्या खोऱ्यात मेंढपाळ धनगर अन्यायग्रस्त व अतिशय हलाखीचे आयुष्य जगत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत झालेला आहे. कोरोना च्या कठीण परिस्थितीतही, काही पर्याय नसल्याने राज्यभर ठिकठिकाणी आज ‘ढोल बजाओ’ आंदोलन घेण्यात आले. राज्यभरातील सर्व संघटना, समित्या यांनी एकत्र येऊन तालुका व जिल्हा पातळीवर हे आंदोलन करावे असे आवाहन खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी केले होते. त्याला भक्कम प्रतिसाद मिळून हे राज्यव्यापी आंदोलन यशस्वीपणे करण्यात आले.


यात सर्व संघटना, समित्या आणि संपूर्ण धनगर समाजाचाच नव्हे तर या आरक्षणाला पाठींबा देणा-या अनेकांचा सहभाग होता.
खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी आमदार श्री निरंजनजी डावखरे, श्री संजयजी केळकर, माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्नमुख नरेन्द्र पवार यांनीही ढोल वाजवून आंदोलन केले. कोरोना महामारी मुळे, नियमांचे पालन करून हे आंदोलन झाले. यावेळी ज्ञानेश्वर परदेशी, संतोष आव्हाड, अशोक शेळके, राजू बर्गे, निहारिका गोंदले, विशाखा खताळ, डाॅ. अरूण गावडे, राजेन्द्र पांढरे, अक्षय मासाळ, भास्कर यमगर, दीपक कुरकुंडे व इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलना नंतर जाण्याचे जिल्हाधिकारी यांचेकडे मा. मुख्यमंत्रांकडे पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्रातील धनगर जमातीस त्वरित ST  आरक्षण लागू करावे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर जमातीसाठी केलेल्या एक हजार कोटी निधीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here