Thursday, June 17, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई आर्थिक धोक्यात! 'हे' फाईव्ह स्टार हॉटेल बंद, कामगारांचा पगार देण्यासाठीही पैसे...

मुंबई आर्थिक धोक्यात! ‘हे’ फाईव्ह स्टार हॉटेल बंद, कामगारांचा पगार देण्यासाठीही पैसे नाहीत

मुंबई : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

कोरोना संकटामुळे आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची परिस्थिती बिकट आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध लक्झरी 5 स्टार हॉटेल हयात रेसिडेन्सी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. हॉटेल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती खराब असल्याने कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी त्यांच्याकडेही हॉटेलकडे पैसे नाहीत.

मुंबई विमानतळाजवळ हे हॉटेल आहे. हे हॉटेल एशियन हॉटेल्स वेस्ट लिमिटेड कंपनीच्या मालकीचे आहे. ७ जून रोजी हॉटेलकडून एक नोटीस बजावण्यात आली असून, ज्यात हॉटेलचे महाव्यवस्थापक हरदीप मारवाह यांनी सांगितले की, त्यांच्या मूळ कंपनीने हॉटेल चालविण्यासाठी पैसे पाठवले नाहीत.

नोटीसमध्ये लिहलं आहे की, ‘एशियन हॉटेल वेस्ट लिमिटेड, हयात रेसिडेन्सी मुंबईच्या मालकाकडून निधी येत नसल्याची माहिती सर्व कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे. आम्ही लोकांचे पगार देण्यास आणि हॉटेल चालवण्यास सक्षम नाही. यामुळे तत्काळ परिणाम म्हणून हॉटेलमध्ये तात्पुरते कोणतेही काम होणार नाही. पुढील सूचना येईपर्यंत हॉटेल बंद राहील.’

कोरोना कालावधीत वाईट परिणाम

कोरोना विषाणूच्या संकटामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. जानेवारी 2020 पासून, आता जून 2021 आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या धोकादायक संसर्गामुळे लोक उघडपणे बाहेर येत नाहीत. यामुळे हॉटेल उद्योग आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जेव्हा परिस्थिती सुधारली होती, तेव्हा असे वाटत होते की आता हॉस्पिटॅलिटी क्षेत्र पुन्हा जोमाने सुरू होईल, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेही त्या आशा नष्ट केल्या.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW