Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रmumbai news today marathi live: मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला,...

mumbai news today marathi live: मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती – mumbai news a portion of a building collapsed in the fort area of mumbai


हायलाइट्स:

  • मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला
  • ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
  • सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईत (Mumbai News) आणखी एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका पाच मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 34 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून तब्बल 5 जण ढिगाराखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही पाच मजली इमारत दक्षिण मुंबईतील फोर्ट (South Mumbai Fort) भागात होती.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झाले असून सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. इमारतीमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. याचवेळी हा अपघात झाला आहे.

ही इमारत काही वर्ष जुनी आहे आणि त्याच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम चालू होते. ही इमारत म्हाडाची असून ज्या भागाची दुरुस्ती केली जात होती तोच भाग पडला आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

इमारतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे. बचावलेल्या 34 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेमध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नसून अधिक बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
mumbai news today marathi live: मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती - mumbai news a portion of a building collapsed in the fort area of mumbaiमोठी घडामोड! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापेSource link

mumbai news today marathi live: मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती - mumbai news a portion of a building collapsed in the fort area of mumbai
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News