Monday, June 21, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी घट; 'ही' आहे ताजी आकडेवारी

मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी घट; ‘ही’ आहे ताजी आकडेवारी

मुंबई: मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत मुंबईत ६६० नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ७६८ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. आज करोनाने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा आता १५ हजार १२२ इतका झाला आहे. ( Coronavirus In Mumbai Latest Updates )

मुंबई महापालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे करोना संसर्गाचा विळखा सैल झाला आहे. गेले काही दिवस करोनाचा ग्राफ उतरता राहिला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट आता ९५ टक्के इतका असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ५६६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या २५ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या २५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ९३ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

करोनाची आजची स्थिती अशी:

२४ तासांत बाधित रुग्ण – ६६०
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ७६८
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८१२८८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १५८११
रुग्ण दुप्पटीचा दर- ५६६ दिवस
कोविड वाढीचा दर ( ३ जून ते ९ जून)- ०.१२ %

ठाणे जिल्ह्यात करोनाबळींची संख्या १० हजाराच्या पार

ठाणे जिल्ह्यात करोनाबळींची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून गुरुवारी ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ठाणे शहरात ४, कल्याण-डोंबिवली ६, नवी मुंबई ४, भिवंडी १, मिरा-भाईंदर १, अंबरनाथ ४५, ठाणे ग्रामीणमध्ये ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये गुरुवारी एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यातील मृतांची संख्या वाढत १० हजार ५६ इतकी झाली आहे तर दिवसभरात ४९८ नवीन रुग्ण आढळले. परिणामी बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख २३ हजार ४९७ वर गेली आहे.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW