Home मुंबई अरविंद केजरीवाल हे हार्दिक पटेलला गळाला लावण्याच्या तयारीत; आम आदमी पार्टीचा बनू शकतो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

अरविंद केजरीवाल हे हार्दिक पटेलला गळाला लावण्याच्या तयारीत; आम आदमी पार्टीचा बनू शकतो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

0
अरविंद केजरीवाल हे हार्दिक पटेलला गळाला लावण्याच्या तयारीत; आम आदमी पार्टीचा बनू शकतो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

[ad_1]

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद – सन २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणूकांची राजधानीत जोरात चर्चा सुरू झाली असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीचा विषय चर्चेत आणला आहे. पण तो आणताना केजरीवाल हे राज्यात नवीन राजकीय चाल खेळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. Arvind kejriwal may rope in Hardik patel as CM candidate of gujrat from AAP

पाटीदार समाजातला तरूण नेता हार्दिक पटेल याला आम आदमी पक्षाच्या गळाला लावून केजरीवाल आम आदमी पक्षाची नवी वोट बॅँक तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. हार्दिक पटेल सध्या काँग्रेसमध्ये आहे. पण त्याला तेथे राजकीयदृष्ट्या कोणी विचारत नाही. शिवाय एकेकाळी संपूर्ण गुजरातमध्ये हवा निर्माण केलेले पाटीदार आंदोलनही सध्या थंड आहे.



पाटीदार समाजाची रविवारी एक बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये गुजरातमध्ये पुढचा मुख्यमंत्री हा पाटीदार समाजाचा असला पाहिजे, याचा आग्रह धरण्यात आला. हार्दिक पटेल हे पाटीदारांमधले सगळ्यात पॉप्युलर नाव आहे. त्यामुळे त्या नावाचा फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो, असा अरविंद केजरीवाल यांचा होरा असल्याचे बोलले जात आहे. अर्थात आम आदमी पक्षाकडून तसे अधितकृतरित्या सांगितले गेलेले नाही. दै. भास्करने ही बातमी दिली आहे.

पण हार्दिक पटेलची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आणि आम आदमी पक्षाने त्याची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी जाहीर केली, तर सत्तेवर येण्याची कितपत खात्री देता येईल, हे सांगता येणार नाही. पण आम आदमी पक्षाची स्वतःची वोट बँक तयार होऊ शकते. राज्यात नगण्य असलेला पक्ष एकदम सत्ता स्पर्धेतला महत्त्वाचा घटक ठरू शकतो एवढे मात्र नक्की. या दृष्टीने केजरीवाल यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. गुजरातमधल्या सर्व १८२ जागा लढविण्याची घोषणा हे त्यातले पहिले पाऊल आहे.

Arvind kejriwal may rope in Hardik patel as CM candidate of gujrat from AAP

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here