Home मुंबई अशी करा म्युच्युअल फंडात गुतंवणूक

अशी करा म्युच्युअल फंडात गुतंवणूक

0
अशी करा म्युच्युअल फंडात गुतंवणूक

[ad_1]

गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झालेली आहा. त्यासाठी शेअऱ बाजाराचे आकर्षण तेथील परत व्याबाबतचे आकर्षण हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या काही वर्षांत बॅंकेतील मुदत ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात झालेली आहे. हे देखील यामागील कारण आहे. Here’s how to invest in a mutual fund

मात्र थेट शेअर बाजारात उडी मारण्यापेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून मोठा लाभ होतो. वेगवेगळे फंड सध्या पेपरमधून तसेच टीव्हीवरुन मोठी जाहिरात करतात. तसे, सध्या मोठमोठ्या शहरात फंडाची माहिती देणारे जाहिरात फलकही असतात. त्याचाही हा परिणाम आहे. तरीही अनेकांना यात कशाप्रकारे गुंतवणूक करायची याची माहिती नाही.

खरे तर कोणत्याही फंडात तुम्ही पाचशे रुपयांपासून त्या पटीत पुढे कितीही पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी त्या संबंधित योजनेचा अर्ज भरणे गरजेचे आहे. याच योजनेची एसआयपी करणार असाल तर अजून एक त्या संबंधीचा अर्ज भरावा लागेल. आपण जर लहानग्यांसाठी गुंतवणूक करत असाल तर फक्त पालकच गुंतवणूक करू शकतात. लहानग्याशी नातं दर्शवणारी कागदपत्रं सादर करावी लागतात.

उदा. जन्म दाखला. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना तीन पर्याय उपलब्ध असतात. वृद्धी, लाभांश, आणि लाभांश पुनर्गुतवणूक. यातील एक पर्याय आपणांस निवडावा लागतो. वृद्धी या पर्यायामध्ये आपणांस लाभांश मिळत नाही. गुंतवणुकीत वृद्धी होत असते. युनिट धारकास काहीही मिळत नाही.

युनिट्स च्या एनएव्ही मध्ये वाढ होत असते. गुंतवणुकीच्या वेळचे एनएव्ही आणि विक्रीच्या वेळी असणारी एनएव्ही यातील फरक म्हणजे नफा किंवा तोटा होय. गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न हे लाभांशद्वारे वाटप होते. डेब्ट फंड असेल तर मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, किंवा वार्षिक लाभांश मिळतो. इक्विटी फंड असेल तर लाभांश जेव्हा जाहीर होतो त्यावेळी मिळतो. फंडास फायदा असेल तरच लाभांश मिळतो. लाभांश पुनर्गुतवणूकीत युनिट धारकास लाभांश देण्याऐवजी त्या किमतीचे युनिट्स दिले जातात म्हणजेच लाभांश पुन्हा गुंतवला जातो. म्युच्युअल फंड खरेदी अनेक प्रकारांनी करता येतो. आनलाईन किंवा ऑफलाईन, थेट किंवा नियमित प्रकारच्या योजनेत करता येते.

Here’s how to invest in a mutual fund

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here