[ad_1]
petrol and diesel price hike : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर आल्यामुळे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी म्हटले की, राजस्थान व महाराष्ट्रासारख्या कॉंग्रेस शासित राज्यांनी वाहन इंधनावरील कर कमी करावा. तथापि, भाजप शासित मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये असे करणार काय, यावर त्यांनी मौन बाळगले, तेथेही पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. petrol and diesel price hike Dharmendra Pradhan said – Rahul Gandhi should answer, why it is so expensive in Congress ruled states
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर आल्यामुळे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी म्हटले की, राजस्थान व महाराष्ट्रासारख्या कॉंग्रेस शासित राज्यांनी वाहन इंधनावरील कर कमी करावा. तथापि, भाजप शासित मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये असे करणार काय, यावर त्यांनी मौन बाळगले, तेथेही पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सर्वसामान्य जनतेवर वाहनांच्या इंधन दराच्या वाढत्या बोजाबद्दल कॉंग्रेस चिंतेत असेल तर त्यांनी सत्ता असलेल्या राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर कमी करावा.
6 आठवड्यांत पेट्रोल 5.72, तर डिझेल 6.55 रुपयांनी वाढले
मागच्या सहा आठवड्यांच्या तुलनेत पेट्रोल 5.72 रुपये तर डिझेल 6.25 रुपयांनी महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे वाढते दर आणि उच्च केंद्रीय व राज्य कर यामुळे वाहन इंधनाचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लि. महाराजा अग्रसेन रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, महामारी आणि इतर विकास कामांसाठी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांना पेट्रोल, डिझेलवरील करातून जादा पैशांची गरज आहे. वाहनांच्या इंधन दराचा ग्राहकांना त्रास होत असल्याचे त्यांनी कबूल केले. वाहन इंधन दराबाबत नरेंद्र मोदी सरकारवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने हल्ला चढवलेला आहे. यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमध्ये इंधन महाग का आहे? हे राहुल गांधींनी स्पष्ट करावे.
राहुल गांधींना सवाल
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा कॉंग्रेस शासित राज्यांमध्ये इंधनाचे दर इतके जास्त का आहेत याचे उत्तर राहुल गांधींनी दिलेच पाहिजे. ते म्हणाले, “जर राहुल गांधींना वाहनांच्या इंधन दराचा गरिबांवर परिणाम होण्याची चिंता वाटत असेल तर त्यांनी कॉंग्रेस शासित राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना इंधनावरील कर कमी करण्यास सांगावे.”
petrol and diesel price hike Dharmendra Pradhan said – Rahul Gandhi should answer, why it is so expensive in Congress ruled states
महत्त्वाच्या बातम्या
[ad_2]
Source link