[ad_1]
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – विधानसभेची निवडणूक २०२२ मध्ये पंजाबमध्ये आहे. भांडण काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आहे. आणि गोवले जातेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव… political fight between delhi and punjab education ministers over quality education in respective states
पंजाबमधल्या शैक्षणिक गुणवत्तेवरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची राजकीय अब्रू काढली. पण त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गोवले. ज्या अमरिंद सिंग यांच्या काळात पंजाबमधल्या ८०० शाळा बंद झाल्या, हे अमरिंदर सिंग यांचे अपयश आहे. पण पंतप्रधान मोदींनी ट्विट करून त्यांचे कौतूक केले. ही पाहा दोघांची जुगलबंदी… असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले.
त्याला ताबडतोब उत्तर दिले ते मोदींनी किंवा त्यांच्या समर्थकांनी नाही, तर पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांनी. पंजाबचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंग यांनी ट्विट केले की, मनीष सिसोदियांनी “Learning Level & Quality” parameter in “Performance Grading Index” हे आधी तपासून पाहावे आणि मग ट्विट करावे. या इंडेक्समध्ये पंजाबमधील शैक्षणिक गुणवत्ता दिल्लीच्या गुणवत्तेच्या तुलनेत चांगली असल्याचे नमूद केले आहे, याकडे विजय इंदर सिंग यांनी लक्ष वेधले आहे.
विधानसभेची निवडणूक २०२२ मध्ये पंजाबमध्ये आहे. भांडण काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आहे. आणि गोवले जातेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव… कारण शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी इंडेक्स केंद्र सरकारने जारी केला आहे. पण त्यामध्ये फक्त पंजाब किंवा दिल्ली यांचा उल्लेख नसून सर्वच राज्यांचे वास्तव मांडले आहे. पण पंजाब आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्र्यांनी एकमेकांविरोधात त्याचा राजकीय हत्यारासारखा वापर केला आहे.
Punjab Education Minister Vijay Inder Singla advised Delhi counterpart Manish Sisodia to first check fact regarding the status of “Learning Level & Quality” parameter in “Performance Grading Index” released by Centre before stooping so low to unnecessarily politicise the issue https://t.co/LY6HrscX1D
— ANI (@ANI) June 13, 2021
political fight between delhi and punjab education ministers over quality education in respective states
[ad_2]
Source link