Home मुंबई ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

0
ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

[ad_1]

British queen birthday : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मिदनी सन्मानित होणाऱ्यांच्या यादीमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान सहभागी भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. Indian Origin Medical professional will be honored on the occasion of British queen birthday


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मिदनी सन्मानित होणाऱ्यांच्या यादीमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान सहभागी भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. कोलकाता येथे जन्मलेल्या दिव्या चढ्ढा मानेक यांना लसीच्या क्षेत्रात संशोधन, विकास आणि यानंतर क्लिनिकल ट्रायलमध्ये महत्त्वाची भूमिका तसेच महामारीदरम्यान दिलेल्या सेवांबद्दल ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एप्मायरने सन्मानित करण्यात येणारआहे. मानेक सध्या ब्रिटिश सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्था (एनआयएचआर) क्लिनिकल रिसर्च नेटवर्कमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अँड मार्केटिंगच्या संचालक आहेत.

मानेक तरुण वयातच ब्रिटनमध्ये आल्या होत्या. त्या म्हणाल्या, “हा सन्मान केवळ मलाच नाही तर यूकेमध्ये लस संशोधनात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा आहे. जेव्हा मी भारतातून यूकेला आले तेव्हा मी 18 वर्षांची होते. माझ्या वडिलांनी मला विमानाचे तिकीट आणि 500 पाउंड दिले आणि म्हटले होते की, ‘चांगले काम कर आणि असे विलक्षण कर जेणेकरून तू राणीला भेटू शकशकील.’ गतवर्षी मी माझ्या वडलांना गमावले, परंतु हा सन्मान म्हणजे खरोखरच त्यांच्यासाठी मी काहीतरी चांगले केले आहे असे वाटते. या सन्मानाबद्दल आभार.”

मानेक यांच्याव्यतिरिक्त, ऑक्सफोर्ड विद्यापीठातील बालरोग संसर्ग विशेषज्ञ प्रोफेसर अँड्र्यू पोलार्ड यांना सार्वजनिक आरोग्याच्या सेवेबद्दल, विशेषत: कोरोनादरम्यान आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या विकासातील त्यांच्या भूमिकेबद्दल नाईटहूड देऊन गौरविण्यात आले.

दरवर्षी महाराणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवशी सन्मानित होणाऱ्यांची यादी जाहीर केली जाते. यावर्षी सन्मानित होणाऱ्या 30 हून अधिक भारतीयांमध्ये ओबीई श्रेणीत जसविंदरसिंग राय, मेंबर्स ऑफ द ब्रिटिश एम्पायरच्या श्रेणीत देवीना बॅनर्जी, अनुप जीवन चौहान, डॉ. अनंतकृष्णन रघुराम यांचा समावेश आहे.

Indian Origin Medical professional will be honored on the occasion of British queen birthday

महत्त्वाच्या बातम्या

 

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here