Home मुंबई भोजपूरी सिनेमा, गाण्यांमधील अश्लीलता रोखण्यासाठी रवि किशन सरसावला; कायदा करण्याची केंद्र सरकारला साकडे

भोजपूरी सिनेमा, गाण्यांमधील अश्लीलता रोखण्यासाठी रवि किशन सरसावला; कायदा करण्याची केंद्र सरकारला साकडे

0
भोजपूरी सिनेमा, गाण्यांमधील अश्लीलता रोखण्यासाठी रवि किशन सरसावला; कायदा करण्याची केंद्र सरकारला साकडे

[ad_1]

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – भोजपूरी सुपरस्टार रवि किशन आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी ओळखला जातो. त्याची लोकप्रियता पाहूनच त्याला भाजपने लोकसभेत निवडून येण्याची संधी दिली. रवि किशन हा उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचला आहे. ज्याचे प्रतिनिधित्व आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत होते. Actor and Gorakhpur MP Ravi Kishan writes to Union Information Minister Prakash Javadekar and UP CM Yogi Adityanath

आता रवि किशन भोजपूरी सिनेमाच्या प्रगतीसाठी पुढे सरसावला असून त्याचा पहिला भाग म्हणून भोजपूरी सिनेमातला अश्लीलता रोखण्यासाठी कायदा करावा अशी मागणी त्याने केंद्र सरकारकडे केली आहे.

रवि किशन याने याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सविस्तर पत्र लिहिले असून भोजपूरी सिनेमाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने करायच्या काही उपाययोजनाही सूचविल्या आहेत.


उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ


या पत्राच्या प्रती रवि किशन याने संस्कृती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि संस्कृती, युवा विभागमंत्री आलोक रंजन यांनाही पाठिवल्या आहेत.

सोशल मीडियातून भोजपूरी गाणी आणि सिनेमातली अश्लीलता अधिक भडकपणे दाखविण्यात येते. त्यामुळे संपूर्ण समाजाचा समज भोजपूरी सिनेमा हा अश्लीलच आहे, असा होतो. प्रत्यक्षात भोजपूरी भाषा ही भारताची मोठी सांस्कृतिक विरासत आहे. तिच्यात महान साहित्यही निर्माण झाले आहे. त्याची जपणूक व्हावी आणि भोजपूरी सिनेमातून अश्लीलता फैलावणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रामध्ये रवि किशन यांनी केली आहे.

रवि किशन याने महात्मा गांधींचा चंपारण्य सत्याग्रह, १८५७ चे महान सेनानी वीर कुंवर सिंह, भोजपुरी भाषेतले लोकनाट्य लेखक भीखारी ठाकुर और लोकगायक महेंद्र मिश्र यांचा देखील पत्रामध्ये उल्लेख केला आहे.

Actor and Gorakhpur MP Ravi Kishan writes to Union Information Minister Prakash Javadekar and UP CM Yogi Adityanath



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here