Home मुंबई “राज ठाकरेंना प्रबोधनकारांच्या वाटेवरून जायचे नसून RSS च्या वाटेवर जायचे आहे,हे…” सचिन खरात यांचा ठाकरेंवर निशाणा

“राज ठाकरेंना प्रबोधनकारांच्या वाटेवरून जायचे नसून RSS च्या वाटेवर जायचे आहे,हे…” सचिन खरात यांचा ठाकरेंवर निशाणा

0
“राज ठाकरेंना प्रबोधनकारांच्या वाटेवरून जायचे नसून RSS च्या वाटेवर जायचे आहे,हे…” सचिन खरात यांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जोरदार बॅटिंग केली.शिंदे गटासह भाजपवर देखील राज ठाकरेंनी यावेळी निशाणा साधला. तसेच मनसेने आंदोलन अर्धवट सोडल्याच्या मुद्द्यावरून देखील राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आपली कामे घरोघरी पोहचवण्याचे आवाहन केले. यानंतर आता आरपीआयचे अध्यक्ष (खरात) सचिन खरात यांनी राज ठाकरे हे, “प्रबोधनकारांच्या वाटेवर नसून आर एस एसच्या वाटेवर चालत आहेत” अशी टीका केली आहे.

माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे त्यांचे विचार आहेत. मी त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहे, असं राज ठाकरे मंगळवारी बोलताना म्हणाले होते.

त्यानंतर आता सचिन खरात यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”राज ठाकरे तुम्हाला खरंच प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जायचे असतील तर पहिल्यांदा त्यांनीच लिहिलेलं ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे” हे पुस्तक वाचावे. पण राज ठाकरे आपण महाराष्ट्रात धार्मिक राजकारण करत आहात. आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाटेवर जायचं नसून आपल्याला आरएसएसच्या वाटेवर जायचं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुमच्यासोबत येणार नाही, हे ध्यानात ठेवा’ असंही सचिन खरात यावेळी म्हणाले.

राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बऱ्याच महिन्यानंतर त्यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा सूतोवाच देखील केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here