Home मुंबई संरक्षणातही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, देशात बनलेल्या पहिल्या तीन आण्विक पाणबुड्यांतील 95 टक्के उपकरणेही मेड इन इंडिया

संरक्षणातही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, देशात बनलेल्या पहिल्या तीन आण्विक पाणबुड्यांतील 95 टक्के उपकरणेही मेड इन इंडिया

0
संरक्षणातही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, देशात बनलेल्या पहिल्या तीन आण्विक पाणबुड्यांतील 95 टक्के उपकरणेही मेड इन इंडिया

[ad_1]

nuclear submarines built in the india : भारताची पाणबुडी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पहिल्या तीन स्वदेशी अणु पाणबुडींमध्ये 95 टक्के मेड इन इंडिया उपकरणे असतील, त्यात पुढील तीन आण्विक पाणबुड्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती तीन स्वदेशी आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या पाणबुड्या विशाखापट्टणममध्ये डीआरडीओ तयार करणार आहे. About 95 per cent of the equipment in first three nuclear submarines built in the india is also made in India


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची पाणबुडी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पहिल्या तीन स्वदेशी अणु पाणबुडींमध्ये 95 टक्के मेड इन इंडिया उपकरणे असतील, त्यात पुढील तीन आण्विक पाणबुड्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती तीन स्वदेशी आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या पाणबुड्या विशाखापट्टणममध्ये डीआरडीओ तयार करणार आहे.

हा प्रकल्प अरिहंत श्रेणी प्रकल्पापेक्षा वेगळा आहे. या प्रकल्पांतर्गत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता असणाऱ्या सहा आण्विक पाणबुड्या तयार करण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अण्वस्त्र सज्ज पाणबुडी प्रकल्पामुळे स्वदेशी पाणबुडी क्षमतेत भर पडेल कारण त्यापैकी 95 टक्के पाणबुडीची भारतात निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातून खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांसह देशांतर्गत संरक्षण क्षेत्राला मोठा चालना मिळेल.

सूत्रांनी सांगितले की, योजनाकारांना विश्वास आहे की ते बाहेरील मदतीशिवाय सहा आण्विक पाणबुड्या तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण करतील. आवश्यक असल्यास ते सामरिक भागीदार देशांपैकी एकाची मदत घेऊ शकतात. संरक्षण क्षेत्रातील मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याने हा प्रकल्प अर्थव्यवस्थेलाही बरीच मदत करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

यातील पहिल्या तीन पाणबुडी बांधण्यासाठी नौदल आणि डीआरडीओला मंजुरी मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी तीन पाणबुड्या बांधण्याचा पर्याय आहे. भारतीय नौदलाचा सहा देशी आण्विक पाणबुडी ठेवण्याचा प्रस्ताव हा संरक्षण-आधुनिकीकरणाच्या काही प्रमुख प्रस्तावांपैकी एक होता. या प्रस्तावाला नरेंद्र मोदी सरकारने 2014 मध्ये सत्तेत येताच मान्यता दिली होती. जरी काही विलंब झालेला असला तरी स्वदेशी पाणबुडी बांधण्याच्या क्षमतेमध्ये भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे.

About 95 per cent of the equipment in first three nuclear submarines built in the india is also made in India

महत्त्वाच्या बातम्या

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here