
मुंबई -शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेची वाटचाल नेमकी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आगामी राजकीय वाटचालीसाठी शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची घोषणा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाईसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मनसेने देखील या युतीवर भाष्य केलं आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता एका वाक्यात युतीबाबत भाष्य केलं आहे. आमदार पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात,”सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!” त्यासोबतच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या युतीबाबत भाष्य केलं आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेच्या युतीनंतर एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात,”महाराष्ट्रात ज्या लोकांनी जातीय वादाच विष पेरलं त्यांच्याशी युती म्हणजे मा.बाळसेबांच्या विचाराला तिलांजली.”वारसा हा वास्तूंचा नसतो विचारांचा असतो “पण सत्ते साठी माती खाणाऱ्यांना काय कळणार?” अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात ज्या लोकांनी जातीय वादाच विष पेरलं त्यांच्याशी युती म्हणजे मा.बाळसेबांच्या विचाराला तिलांजली.”वारसा हा वास्तूंचा नसतो विचारांचा असतो”पण सत्ते साठी माती खाणाऱ्यांना काय कळणार?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 27, 2022
शिवसेनेने संभाजी ब्रिगडशी केलेल्या युतीनंतर आगामी निवडणूक सोबत लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.