Home देश-विदेश झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर

झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर

0
झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर

बिजींग: चीनमधील मार्स रोव्हर Zhurong ने मे मध्ये मंगळावर लँडिग केले होते. तेव्हापासून तो यूटोपिया प्लॅनिटिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशाल मार्टियन लावाच्या मैदानातील भूगोलशास्त्रांचा अभ्यास करीत आहे.Zhurong Rover : China’s Zhurong Mars rover took a group selfie with its lander

चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो जारी केलेत. यात मंगळ ग्रहावरील धुळ आणि डोंगराळ भागात चीनचा राष्ट्रीय ध्वज लावलेला हा चीनचा रोव्हर दिसत आहे .

सीएनएसएने मंगल ग्रहावरील 4 फोटो शेअर केलेत. यात झुरोंग रोव्हरचा वरचा भाग दिसत आहे. प्लॅटफॉर्ममधून बाहेर निघण्याआधीचंही दृष्य यात पाहायला मिळतं आहे.

जुरोंग रोव्हरने जवळपास 10 मीटर अंतरावर आपला रिमोट कॅमेरा लावला आणि अनेक फोटो काढले .

चीनने मागील महिन्यात मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हरसोबत तियानवेन-1 अंतराळ यान उतरवलं होतं. याआधी हे यान जवळपास 3 महिने मंगळाच्या कक्षेत होतं.

अमेरिकेनंतर मंगळावर अंतराळ यान पाठवणारा चीन जगातील दुसरा देश आहे. यानाच्या ऑर्बिटर आणि लँडर दोन्हींवर चीनचा राष्ट्रध्वज आहे. 6 पायांचं चीनच रोव्हर मंगळावरील युटोपिया प्लानिशिया या भागाची पाहणी करत आहे.

Zhurong Rover : China’s Zhurong Mars rover took a group selfie with its lander

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here