नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसऱ्या लाट सातत्याने ओसरत चालली आहे. आज 70 दिवसानंतर देशात कोरोनाचे सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 84,332 नवीन रुग्ण आढळले, तर 4002 जणांनी प्राण गमावले आहेत. त्याचबरोबर 1 लाख 21 हजार 311 जण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे काल 40,981 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाले. यापूर्वी 1 एप्रिल रोजी 81,466 नवीन रुग्ण आढळले होते.
आज सलग 30व्या दिवशी देशात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांपेक्षा जास्त बरे झाले आहेत. 11 जूनपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 24 कोटी 96 लाख डोस देण्यात आले आहेत. गत दिवशी 34 लाख 33 हजार लसी देण्यात आल्या. आतापर्यंत 37 कोटी 62 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल सुमारे 20 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, यातील पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
देशातील कोरोनाची सद्य:स्थिती
एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 93 लाख 59 हजार 155
एकूण बरे झालेले – 2 कोटी 79 लाख 11 हजार 384
एकूण सक्रिय रुग्ण – 10 लाख 80 हजार 690
एकूण मृत्यू – 3 लाख 67 हजार 81
देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 1.24 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सक्रिय रुग्ण 4 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्या एकूण संख्येच्या बाबतीत भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.
महाराष्ट्रात 2,213 मृत्यूंची नोंद
शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 11,766 नवीन रुग्ण आढळले, तर एकूण 2213 जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांसह संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58 लाख 87 हजार 853 झाली आहे आणि मृतांचा आकडा 1 लाख 6 हजार 367 वर पोहोचला आहे. यापूर्वी 26 मे ते 10 जून या कालावधीत कोविडचे 8074 रुग्ण मृत्युमुखी पडले होते.
[ad_2]