[ad_1]
विशेष प्रतिनिधी
मुंबई:राज्य सरकारने कोरोनामुळे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी आणि मार्कांच्या आधारावर पास करण्यात येण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे.HSC Exam 2021:Maharashtra HSC to pass Class 12 students on basis of internal assessments
२ जून रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर चर्चा झाली होती. ज्यानंतर ३ जून ला याबद्दलचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.
राज्यातील १४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. परंतू सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा होणार की नाही याबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रम होता. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारने ही परीक्षा रद्द करत मुलांना दिलासा दिला.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यमापनाच्या कार्यपद्धतीबद्दल राज्य सरकार स्वतंत्रपणे आदेश काढणार आहे.
बारावीच्या परीक्षांचं आयोजन केलं असतं तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती होती. त्यामुळे भविष्यातील तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला पहिलं प्राधान्य देत परीक्षा रद्द केली होती.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 1 जून रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र सरकारने बारावीची CBSE बोर्डाची परीक्षा रद्द (12th Exam cancelled) करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. यावेळी बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष यांच्यासमवेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन पंतप्रधान मोदींनी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
HSC Exam 2021:Maharashtra HSC to pass Class 12 students on basis of internal assessments
[ad_2]
Source link