रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक बैठकीत गुरुवारी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ते म्हणाले की रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रवास आतापर्यंत चांगला झाला आहे असून रिटेल क्षेत्रात वेगाने पुढे गेलो आहोत. आगामी काळात रिटेल क्षेत्रात आणखी वाढ होणार असून रिटेलमध्ये मूल्य निर्मितीची बरीच क्षमता असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.