Nagpur crime: कारच्या डिकीत होता ७० किलो गांजा; पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करताच… – one arrested for ‘smuggling over 69 kg marijuana’ from telangana

0
18


हायलाइट्स:

  • बोरखेडीजवळ पोलिसांचा सिनेस्टाइल पाठलाग
  • सेलो टेपमध्ये गुंडाळलेल्या ३५ पॅकेटमध्ये गांजा
  • तेलंगणातून चंद्रपूरमार्गे तस्करी होत होती

नागपूरः बोरखेडी येथे पोलिसांनी सापळा रचून टोयाटो कारच्या डिकीत चंद्रपूरमार्गे नागपुरात आलेला ७० किलो गांजा पकडला. गुरुवारी दुपारी नागपूर – चंद्रपूर मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

हा गांजा चंद्रपूर मार्गे नागपूरात येत असल्याची टीप सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत गुप्तरित्या डी. एल. ७ सी. जी. ४३४१ या कारचा पाठलाग केला. बोरखेडी टोलनाक्यावरून ही गाडी पास झाल्याची माहिती मिळताच पोलिस सक्रिय झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करीत तिला महामार्गावर रोखले.

कारची डिकी तपासली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून तस्करी केली जात असल्याचे पोलिसांना दिसले. ग्रामीणचे पोलिस अधिक्षक राकेश ओला, पोलिस अधिक्षक राहूल माकनीकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपनिरीक्षक आशिष मोरखेडे यांच्या पथकाने ही सिनेस्टाईल धडक कारवाई केली.

वाचाःकरोनाकेंद्रांचे खासगीकरण होणार? तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर BMCची चाचपणी

हा गांजा तस्करी करणाऱ्या आस मोहम्मद शकूर (वय २९, रा. विधानपूरा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास ३५ पॅकेटमधील ६९ किलो गांजासह १२ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी गांजा तस्करीसाठी वापरलेली ५ लाख किमतीची कार, एक मोबाईल आणि रोख एक हजाराची रक्कमही जप्त केली आहे.

वाचाः औरंगाबाद‘त्याने’ चक्क कुरियरने मागविल्या पाच तलवारी; पोलिसांनी केल्या जप्तSource link