नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्रातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नमो ग्रुप फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.

0
416

पुणे (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली प्रदेश कार्यकारिणी असलेली नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अनेक नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या विचारांच्या सदस्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.

नमो ग्रुप फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री रमेशभाई चौहान, संस्थापक महासचिव श्री महर्षी भाई देसाई, राष्ट्रीय महासचिव राकेश भाई भावसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांच्या निर्देशानुसार नमो ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

प्रदेश मुख्य महासचिव – सुधाकर राजे
प्रदेश महासचिव & प्रदेश प्रवक्ता – अनिल महाजन
प्रदेश महासचिव – शंकरराव वाघ
प्रदेश उपाध्यक्ष – शरद राठोड, डॉ. देवेंद्र खैरनार, भूषण पाटील, योगेश भामरे, आर. के. दिवाकर
प्रदेश सचिव – डॉ. केयुर चौधरी, प्रविण कुंडलकर, रवींद्र महाजन, जितू जैन-बंब
प्रदेश कोषाध्यक्ष – रेवणसिद्ध माने
प्रदेश सहसचिव – राजु शाह, अक्षय ब्राह्मणकर
प्रदेश संपर्क प्रमुख – अनंत कुलकर्णी
संयोजक (सोसिअल मिडीया & आय. टी. सेल) – सिध्दार्थ भोजने
प्रदेश अध्यक्ष युवक – विनायक खालकर-पाटील
प्रदेश अध्यक्ष युवती – अदिती खामकर
प्रदेश कार्यालय मंत्री – अमोल ठाकर
विशेष निमंत्रित सदस्य – हितेश शेठ, अ‍ॅड. सुरेंद्र सोनावणे, भरतभाई पटेल

नमो ग्रुप फाउंडेशन आंतराष्ट्रीय संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारावंर सामाजिक, संस्कृतिक व शैक्षनिक क्षेत्रात काम करण्यासाठी उदयास आलेली असून ही संघटना भारत, नेपाळ आणि अमेरिका या देशात उत्कृष्ट काम करीत आहे. नरेंद्र मोदीजीच्या स्वप्नातील व त्यांचे महान असे कार्य, त्यांच्या उच्च विचारांची इमारत भारतातील प्रत्येक व्यक्ति, नागरिक यांच्या मनात रुजवून त्यांचे रुपांतर विकास गंगेत करण्याचे काम नमो ग्रुप फाउंडेशन संपूर्ण देशभरात करीत आहे.

सन २०१२ साली गुजरात येथील अहमदाबाद शहरात स्थापन झालेल्या नमो फाउंडेशनच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली व नमो फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा पत्रक देऊन त्याच बरोबर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शुभेच्छा पत्रक देऊन नमो फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

येणाऱ्या काळामध्ये अधिक प्रमाणात वेगवेगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन जास्तीत जास्त व्यापक प्रमाणात काम करण्यावर भर देण्यात येईल असे प्रमोद परदेशी यांनी सांगितले. सामाजिक प्रश्न व सामाजिक न्याय यावरही काम करण्यावर भर देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here