आधी अल्पवयीन मुलाचं केलं अपहरण मग कायमचं संपवलं, दोन दिवसांनी आरोपीचा धक्कादायक खुलासा

0
28

नाशिक : (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या अपहरण आणि हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील नवा आझादनगर भागात अल्पवयीन मुलाचं अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या करत आरोपीने मृतदेह एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फेकला. खरंतर, मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी आधीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तपास केला असता मुलाचा शोध लागला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीची चौकशी केली असता दोन आठवड्याने त्याने खुनाची कबुली दिली.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Source link