Monday, June 21, 2021
Homeमनोरंजननेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व...

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

शासननामा न्यूज ऑनलाईन

अदिति बुधाथोकी (aditi budhathoki) हे नाव या काही दिवसांत तुमच्या देखील कानावर आलेच असेल. काय म्हणता? नाही आले. काळजी नसावी, आम्ही सांगतो ही तरुणी कोण आहे. अदिति बुधाथोकी ही मुळची नेपाळची असणारी अभिनेत्री आहे. सध्या ती मुंबई मध्ये राहून अभिनय क्षेत्रात आपले करियर आजमावत आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे तिला अनके चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. चित्रपटांमधून जरी तिला जास्त प्रसिद्धी मिळाली नसली तरी हवा बनके, तुम जहां रहो यांसारख्या म्युझिक व्हिडिओंनी तिला स्वत:चा चाहतावर्ग मिळवू दिला आहे.

खास करून तिच्या अस्मानी सौंदर्यामुळे तरुण वर्ग तिच्यावर जास्त फिदा होत आहे. तिची ही वाढती प्रसिद्धी पाहून साहजिकच चित्रपट निर्मात्यांच्या नजरा देखील तिच्याकडे वळल्या आहेत. त्यामुळे येणारा काळ तिच्या करियर साठी अत्यंत पूरक असणारे आहे हे मात्र नक्की! आज आपण या लेखातून अदिति बुधाथोकीच्या सौंदर्याच्या माध्यमातून नेपाली कल्चरल स्कीन केअर रेमिडीज बद्दल जाणून घेऊया.

सौंदर्याची होते आहे सगळीकडे चर्चा

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

अदिति बुधाथोकीची त्वचा खूप ग्लोइंग आहे. तिच्याकडे पाहतच असे वाटते जणू स्वर्गातली कोणी अप्सरा पृथ्वीवर अवतरली आहे. क्लीन आणि क्लियर स्कीन सोबत अदितीच्या चेहऱ्यावर असणारा गुलाबी रंगाचा साज तिचे सौंदर्य अधिक खुलवतो. तिचे हे रूप म्हणजे तिला मिळालेल्या जेनेटिक्सचे वरदान तर आहेच पण या मागे ती वापरत असलेल्या नेपाली स्कीन केअर टिप्सची देखील महत्त्वाची भूमिका आहे. आज आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर केला तर तुमची त्वचा देखील अत्यंत ग्लोइंग आणि सुंदर दिसू लागेल.

नैसर्गिक रूपाचा प्रभाव

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

या फोटोमध्ये अदितीने गडद गुलाबी रंगाचा स्ट्राइप्ड सूट परिधान केला आहे आणि या सोबत ऑक्सीडाइज्ड सिल्वरचे मोठ मोठे झुमके देखील कानात घातले आहेत, ज्यामध्ये बारीक पर्ल बॉल्स देखील लटकत आहेत. अदितीचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी एवढी फॅशन देखील पुरेशी आहे. आता वळूया अदितीच्या मेकअपकडे! तर काजळ, क्रीम आणि मस्कारा एवढाच मेकअप अदितीसाठी पुरेसा आहे. इतक्या सध्या मेकअप मध्ये सुद्धा ती कितीतरी सुंदर दिसते आहे आणि या सर्वाचे कारण आहे तिची स्वच्छ, तजेलदार आणि मुलायम त्वचा. याच त्वचेची काही रहस्ये आज तुम्हाला कळतील.

नेपाळी ट्रेडीशन स्कीन केअर

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

प्रत्येक देशाच्या स्वत:च्या अशा वेगळ्या परंपरा असतात. तर या परंपररांमध्ये सौंदर्यशास्त्राचा देखील समावेश असतो. ज्यामधून त्या देशात सौंदर्य खुलवण्यासाठी कोणकोणत्या घरगुती उपायांचा वापर केला जातो ते आपल्याला कळते. हे सर्व उपाय तेथील ऋतू, वातावरण, हवा, पाणी या सर्व गोष्टींवर अवलंबून असतात. जसे की भारतामध्ये हळद आणि बेसनचे उटणे लावणे एक सामान्य गोष्ट आहे. चीन मध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केला जातो आणि कोरियामध्ये द्राक्षांच्या बियांपासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर स्त्रिया आपली त्वचा निरोगी राखण्यासाठी करतात. याच प्रकारे नेपाळ ब्युटी रेजिम मध्ये देखील विविध उपायांचा समावेश आहे.

या डाळीचा होतो खास उपयोग

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

मसूर डाळ हा नेपाळी ब्युरी रेजिम मधील एक प्रमुख पदार्थ आहे. नेपाळच्या सौंदर्यशास्त्रामध्ये त्वचेसाठी मसूर डाळ खूप चांगली असल्याचे म्हटले जाते. भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जो फेस पॅक बनवला जातो त्यात मसूर डाळीचा वापर केलेला असतो. अर्थात भारत आणि नेपाल शेजारी देश असल्या कारणाने ही समानता दिसून येणे साहजिक देखील आहे. तुम्ही ड्राय स्कीनसाठी मसूर डाळीचा फेस पॅक बनवू शकता. 2 चमचे मसूर डाळीची पेस्ट, 1 चमचा नारळ, ½’ चमचा मलई आणि 1 चमचा चंदन पावडर हे साहित्य हा फेस पॅक बनवण्यासाठी गरजेचे आहे. या सर्व गोष्टी मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि 25 मिनीटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवून साफ करा.

त्वचा टॅनिंग मुक्त राहते

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की मसूर डाळीचा फेस पॅक लावल्याने त्वचा टॅनिंग मुक्त राहते. तुम्ही नियमित रूपाने या फेस पॅकचा वापर करू शकता. ज्यांची त्वचा ऑईली आहे त्यांनी मसूर डाळीचा फेस पॅक पुढील प्रकारे बनवावा. 2 चमचे मसूर डाळीची पेस्ट, 1 चमचा चंदन पावडर, 2 चमचे गुलाबजल, 1 चमचा एलोवेरा जेल या सर्व गोष्टी मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि चेहरा तसेच मानेवर लावा. त्वचेचा रंग यामुळे उजळत जाईल.

मसूर डाळीची पेस्ट अशी बनवा

नेपाळच्या ‘या’ मुलीने उडवले आहेत भल्या भल्यांचे होश, कोण आहे ही व काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट?

मसूर डाळीची पेस्ट बनवण्यासाठी रात्री झोपण्याआधी मसूर डाळ दूध किंवा गुलाबजल मध्ये भिजत ठेवा. मग सकाळी मध घालून ती वाटून घेऊन त्याची पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्ट मध्ये तुमच्या त्वचेला असणा-या गरजेप्रमाणे साहित्य मिक्स करा. मसूर डाळीचे फेस पॅक नियमित लावल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. या पेस्टमुळे डाग, टॅन कमी होण्यास मदत मिळते. नियमित हा उपाय केल्यास त्वचा निरोगी, नितळ आणि सुंदर राहील.मसूर डाळीची पावडर आपण घरच्या घरीही तयार करू शकता किंवा आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला ही पावडर सहजरित्या मिळेल.

NOTE :- त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मऊ आणि तजेलदार त्वचेसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय, बघा व्हिडिओ!

मऊ आणि तजेलदार त्वचेसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW