Thursday, June 17, 2021
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रNilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले...

Nilesh Rane: नीलेश राणे यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका, म्हणाले…

जळगाव (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर आहेत. ते सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. गुलाबराव एखादी युनिव्हर्सिटी किंवा स्पेस सायन्सचे सेंटर उघडणार नाही तर ते वाळूच चोरणार. त्यांची अक्कलच तेवढी आहे, अशा शब्दांत भाजपचे युवा नेते, माजी खासदार नीलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली.

नीलेश राणे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.नीलेश राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर. ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW