आदित्य ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी शब्द मागे घेतले

0
51

मुंबई: राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी काल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून वातावरण तापण्याची शक्यता दिसताच नीतेश यांनी आज ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यामुळं हा वाद निवळण्याची चिन्हं आहेत.