Monday, June 21, 2021
Homeमनोरंजनआरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

अभिनेत्री नोरा फतेही सध्या आपल्या स्टाइल स्टेटमेंटकडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. कामाच्या ठिकाणी असो किंवा एअरपोर्ट लुक, ही अभिनेत्री आपल्या फॅशनेबल अवतारानं चाहत्यांना घायाळ करते. म्हणूनच नोरा भलेही थोड्या वेळासाठी जरी घराबाहेर पडणार असेल तरी ती बराच वेळ विचार केल्यानंतरच कपड्यांची निवड करत असावी, असेच दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सुद्धा असेच काहीसे उदाहरण पाहायला मिळालं. जेव्हा नोरा किराणामाल आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण यावेळेस तिने जे कपडे परिधान केले होते, ते इतके खास व हटके नसल्याचं पाहायला मिळालं. (सर्व फोटो क्रेडिट : योगेन शाह)

​किराणामाल घेण्यासाठी पोहोचली नोरा

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

मुंबईच्या एका प्रसिद्ध दुकानामध्ये नोरा फतेही सामान खरेदी करण्यासाठी पोहोचली होती. स्वयंपाकघरासाठी आवश्यक असणारे सामान विकत घेण्यासाठी कित्येक सेलिब्रिटी मंडळी याच ठिकाणी येतात. यापैकीच एक नोरा फतेही सुद्धा आहे. अभिनेत्रीला दुकानातून बाहेर पडताना पाहिले आणि तेथे उपस्थित असणाऱ्या पॅपराझीने तिचे फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यास सुरुवात केली.

​अ‍ॅथलीजर स्टाइल

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

नोराने यावेळेसही डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या लुकची विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. तिचा लुक एकदम स्टायलिश होता. सध्या अ‍ॅथलीजर आउटफिट्सचा ट्रेंड जोमात आहे. नोराने सुद्धा अ‍ॅथलीजर स्टाइलची निवड केली होती. यासह तिनं बॅग व हील्स मॅच करून ग्लॅमरस टच देण्याचा प्रयत्न केला.

​टी-शर्ट आणि सायकल शॉर्ट्स

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

नोरा फतेहीने काळ्या रंगाचे व्ही-नेलकाइन टी-शर्ट परिधान केले होते. यासह तिनं साध्या पॅटर्नमधील ब्रालेटऐवजी कॉन्ट्रास्टिंग रंगाची लेस मेड ब्रालेटची निवड केली होती. टी-शर्टवर तिनं सायकल शॉर्ट्स घातल्याचं पाहायला मिळालं. शॉर्ट्समध्ये सी-थ्रू मटेरिअलचा वापर करण्यात आला होता. ब्रालेट आणि ट्रान्सपरंट मटेरियलमुळे नोराला हॉट लुक मिळाला आहे.

​हील्स आणि लग्झरी लेबल बॅग

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

अ‍ॅथलीजर आउटफिट्सवर नोराने स्नीकर्सऐवजी ट्रान्सपरंट स्ट्रॅप हील्स मॅच केले होते. मोहक लुक मिळावा यासाठी तिनं डायमंड स्टड ईअररिंग्स घातले होते. तर टी-शर्टवर तिनं लग्झरी लेबल Yves Saint Laurent ब्रँडची मिनी स्लिंग बॅग सुद्धा कॅरी केली होती.

​इतकी होती बॅगची किंमत

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

नोराने कॅरी केलेली बॅगवर शोल्डर स्ट्रॅप डिझाइन होते आणि पुढील बाजूस गोल्डन YSL इनिशल्झ लोगोसह डेकोरेट करण्यात आले होते. लोगोशी मॅचिंग असणारे गोल्डन झिपर आपण पाहू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगची किंमत जवळपास ८९ हजार रूपये एवढी आहे.

नोराचा हा लुक इतका पडला फिका

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

नोरा फतेहीच्या संपूर्ण लुकबाबत सांगायचे झाले तर तिचा हा स्टायलिश अवतार फिका पडल्याचं वाटतंय. यापूर्वीही तिनं एकापेक्षा एक हटके व सुंदर अ‍ॅथलीझर लुक परिधान करून चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे, त्या तुलनेत हा लुक फारसा हटके दिसत नाहीय. दरम्यान नोरा हॉट आणि बोल्ड फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये सुंदर-सुंदर पोषाखांचे कलेक्शन आहे. त्यानुसार तिचा हा लुक किंचितसा बोरिंग वाटतोय.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW