Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनnupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक,...

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा


बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनची (Kriti Sanon) बहीण नुपुर सेनॉन (Nupur Sanon) ही एक अशी सुंदर सेलिब्रिटी आहे, जिनं आपल्या पहिल्याच अपीयरन्सने लाखो लोकांना अक्षरशः वेड लावलं. नुपुरची हटके स्टाइल पाहून या अभिनेत्रीचे भविष्य फार उज्ज्वल असणार आहे, असे म्हटलं तर अजिबातच चुकीचे ठरणार नाही. दरम्यान करिअरमध्ये घडणाऱ्या बदलांसह नुपुरचा दृष्टीकोन, आत्मविश्वास, ग्रेस आणि कपडे परिधान करण्याच्या स्टाइलमध्येही बरेच बदल दिसत आहेत. याचीच झलक तुम्हाला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळेल.

साधी दिसणारी ही मुलगी आजकाल बोल्ड फॅशनच्या प्रेमात बुडाली आहे. यापूर्वी नुपुर बहुतांश वेळा भारतीय पारंपरिक आउटफिट परिधान करण्यावर भर देत असे. तर आता ही अभिनेत्री बोल्ड डिझाइनर कपडे घालून आपली सुपर फिट फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडत नाहीय. तिचे नवीन अवतारातील हटके फोटो नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – नुपूर सेनॉन इंस्टाग्राम)
(Fashion Problems मुलींच्या ‘त्या’ गंभीर समस्या, ज्याच्या वेदना कोणत्याही पुरुषाला नाही समजणार)

​स्लिट पॅटर्न ड्रेस

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा

नुपुर सेनॉनने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉट अवतारातील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बोल्ड अदा चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये नुपुरने स्किनीफिट ए-लाइन ड्रेस परिधान केल्याचे आपण पाहू शकता. हे आउटफिट कलर ब्लॉक्ड फॅशनपासून इंस्पायर आहे. ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्जसह स्वीट नेकलाइन डिझाइन जोडण्यात आले आहे. फोटोसाठी दिलेल्या पोझमुळे ती एक प्रोफेशन मॉडेल असल्यासारखी दिसतेय. दरम्यान नुपुरने अशा पद्धतीने स्टायलिंग केलं होतं ज्यामुळे तिला क्युट लुक देखील मिळाला होता.

(रणधीर यांच्या नव्या घराची पूजा! करिश्माच्या लेकीचा लुक सर्वांवर पडला भारी, पाहुणे तिलाच पाहत होते एकटक)

​कोणी डिझाइन केला होता ड्रेस

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा

नुपुरने दोन रंगाचा समावेश असणारा बॉडी हँगिंग ड्रेस परिधान केला होता. ड्रेसमध्ये हिरव्या आणि जांभळ्या रंगाचा समावेश होता. हे आउटफिट प्रसिद्ध फॅशन लेबल ‘Aapro’ च्या लेटेस्ट कलेक्शनमधून खरेदी करण्यात आलं आहे. या आउटफिटला ‘Victoria Sheath’ ड्रेस असे नाव देण्यात आलं आहे. कॉटन आणि सॅटन यासारख्या मिक्स्ड बॅग फॅब्रिकपासून हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. उन्हाळ्यामध्ये परिधान करण्यासाठी हा ड्रेस परफेक्ट निवड ठरू शकतो. ड्रेसमध्ये बिशप स्लीव्ह्ज आपण पाहू शकता, ज्यामध्ये मनगटावर टकसह सेक्सी लुक देण्यात आला आहे. तर खांद्याच्या फिटिंगला स्टायलिश पॅटर्नमध्ये डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे ड्रेसला ऑफ-शोल्डर लुक मिळत आहे.

(शाहिद-मीराच्या लग्नात जेनेलियाने घातला बोल्ड व सुंदर ड्रेस, नववधूला सोडून सर्वांची नजर खिळली रितेशच्याच पत्नीवर)

​बोल्डनेसचा तडका

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा

नुपुरने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये मागील बाजूस सीम झिपर जोडण्यात आलं होतं. आउटफिटला बोल्ड टच देण्यासाठी खांद्यावर टॅसल डिझाइनसह मॉडर्न लुक देण्यात आला होता. ज्यामुळे सेक्सी स्लिट लुक अधिक सुंदर दिसत आहे. ड्रेसचे पॅटर्न अँकल लेंथ होते. तसंच या ड्रेसचं फिटिंग बॉडीकॉन होतं, ज्यामुळे नुपुरची आकर्षक फिगर फ्लाँट होण्यास मदत मिळाली आहे.

(श्रद्धा कपूरच्या वहिनीने लग्नात मोडली जुनी परंपरा, लाल रंगाच्या नव्हे तर ‘या’ आकर्षक कपड्यांमध्ये दिसली नववधू)

​ड्रेसची किंमत

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा

कॉन्ट्रास्टिंग रंगांच्या या आउटफिटसह नूपुरने कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिला होता. स्मोकी आईज, बेसिक लायनर आणि गुलाबी रंगाचे लिपस्टिक अशा ब्युटी प्रोडक्टचा उपयोग करून तिनं स्वतःला मॉडर्न टच दिला होता. तसंच या ड्रेसवर तिनं एकही दागिना घातला नव्हता. ड्रेसवर मॅच केलेली पांढऱ्या रंगाची हील्स प्रचंड क्लासी दिसत होती.

या फोटोमधील नुपुर सेनॉनच्या कपड्यांपासून ते तिच्या लुकपर्यंत सर्व काही घायाळ करणारे होते, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. तिचे एक्स्प्रेशन एकदम कमाल दिसत आहेत. तसंच तिच्या पोझ करण्याच्या पद्धतीमुळे साध्या स्टाइलला देखील आकर्षक लुक मिळत आहे. दरम्यान नुपुरने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत ७ हजार ५०० रूपये एवढी आहे.

(कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका)

नुपुर सेनॉनचा मोहक लुक

Source link

nupur sanon bold and hot looks: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीचा हॉट लुक, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले फिदा
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News