Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रofficer caught red handed: चाळीस हजारांची लाच घेताना वन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात...

officer caught red handed: चाळीस हजारांची लाच घेताना वन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात – the forest officer was caught red handed while accepting the bribe in sangamner


हायलाइट्स:

  • संगमनेर तालुक्यातील उपविभागीय वन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
  • स्वीकारत होता ४० हजारांची लाच.
  • विशाल किसन बोराडे असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून तो मूळचा आंबेगाव तालुक्यातील रहिवाशी आहे.

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील उपविभागीय वन अधिकाऱ्याला आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात ४० हजारांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. विशाल किसन बोराडे (वय ४० ) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून मूळचा आंबेगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. (the forest officer was caught red handed while accepting the bribe in sangamner)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथील तक्रारदार याचा मावसभाऊ यांची संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पुर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाले असले बाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजारांची मागणी केली होती.

क्लिक करा आणि वाचा- ग्राहकांना दिलासा, ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही

तक्रादाराने दोन दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे याना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अभिप्राय देणायच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्याने लाचेची मागणी कायम ठेवल्याने तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेनंतर आरोपी लोकसेवक विशाल बोराडे यांनी तक्रारदार यांचेकडे आपल्या मूळगावी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाताना आळेफाटा पैसे येथे स्विकारण्याचे मान्य केले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ९,४८९ नवे रुग्ण; पाहा, आजची ताजी स्थिती!

आळेफाटा चौकात आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष ४० हजार रुपये स्विकरली असता त्यांना रंगेहाथ पकडले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत-आशीष शेलार यांच्या गुप्त भेटीची चर्चा; शेलार यांचा मात्र इन्कारSource link

officer caught red handed: चाळीस हजारांची लाच घेताना वन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात - the forest officer was caught red handed while accepting the bribe in sangamner
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News