Oil India Recruitment 2021 Job Vacancy For 120 Posts Of Junior Assistant, Read Details Here

0
11


नवी दिल्ली : ऑईल इंडिया लिमिटेडने आसामच्या डिब्रूगड, तिनसुकिया, शिवसागर आणि चराईदेव जिल्ह्यांसाठी आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यात ज्युनियर असिस्टंट (क्लर्क-कम-कम्प्युटर ऑपरेटर) पदाच्या भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी ऑईल इंडिया लिमिटेडने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार ऑईल इंडिया लिमिटेडच्या oil-india.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.

ज्युनियर असिस्टंट 120 पदांसाठी भरती प्रक्रिया
ऑईल इंडिया लिमिटेड 120 ज्युनियर असिस्टंट (क्लर्क-कम-कम्प्युटर ऑपरेटर) च्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे.  OIL India Limited च्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार सरकारी मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून कोणत्याही 40 टक्क्यांसह बारावी उत्तीर्ण हवा. अर्जदारांनी किमान सा महिन्यांच्या कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याशिवाय एमएस वर्ड, एमएस एक्सेल, एमएस पावरपॉईंट इत्यादीची संपूर्ण माहिती असणं बंधनकारक आहे.

वयोमर्यादा
ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 120 ज्युनियर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि कमाल 30 वर्ष निर्धारित करण्यात आली आहे. तर एससी/एसटी प्रवर्गासाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल मर्यादा 35 वर्ष आहे. ओबीसी (नॉन-क्रिमीलेयर) अर्जदारांची वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि कमाल 35 वर्ष निर्धारित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क
(ए) खुल्या/ओबीसी उमेदवारांना 200 रुपये ऑनलाईन अर्जाच्या शुल्काच्या स्वरुपात भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज शुल्क नॉन-रिफंडेबल असल्याचं अर्जदारांनी ध्यानात घ्यावं.

(बी) संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्जाचं शुल्क अॅप सिस्टमसह इंटिग्रेटेड पेमेंट गेटवेच्या माध्यमातून केलं जावं. इतर कोणत्याही माध्यमातून ऑनलाईन अर्जाच्या शुल्काचं पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. तसंच इतर माध्यमातून केलेलं पेमेंट रिफंड केलं जाणार नाही.

Oil India Recruitment 2021- अर्ज कसा कराल?

– OIL करंट ओपनिंगच्या अधिकृत वेबसाईट https://www.oil-india.com/ वर जा.
– ज्युनियर असिस्टंटच्या पदासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
– स्क्रीनवर एक नवं पेज ओपन होईल.
– स्वत:ची नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा.
– तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्डवर ओटीपी टाका.
– अर्ज भरा आणि सर्व डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
– अर्जाचं शुल्क भरा.
– भविष्याच्या दृष्टीने नोंदणी अर्जाची हार्ड कॉपी घेऊन ठेवा.Source link