अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

0
8

शासननामा न्यूज ऑनलाईन

अनुष्का शर्मा (actress anushka sharma) म्हणजे आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होय. सर्वात सुंदर आणि फिटनेस प्रिय अभिनेत्री म्हणून तिचा बोलबाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, अनुष्का आज जिथे आहे तिथे ती सहज पोहोचलेली नाही. त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. आज सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून बिरूद मिरवणारी आणि करोडो रुपयांचे मानधन घेणारी अनुष्का कधीकाळी आपल्या लुक्समुळे रिजेक्ट होत होती. एक काळ असा होता जेव्हा तिला कोणतेच निर्माते काम द्यायला तयार नव्हते.

पण तिने हार मानली नाही आज त्या सर्वांच्या नाकावर टिच्चून बॉलीवूड मधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावले. तिचा हा प्रवास सर्वच नवोदित अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहे. तिला ज्या चेहऱ्यावरून रिजेक्शन भोगावे लागले होते, त्याच चेहऱ्याचे रुपडे तिने एका घरगुती उपचाराच्या सहाय्याने बदलले आणि स्वत:ला सिद्ध केले.

बदकासारखा चेहरा आणि लिप जॉब

अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

करियरच्या सुरुवातीच्या काळात अनुष्काला आपल्या लुक्समुळे खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. तिला पहिला चित्रपट मिळाल्यानंतर देखील अनेकांनी तिच्या सुंदर दिसण्याबाबत शंका उपस्थित केली होती. अनेकांनी डक फेस म्हणत तिची खिल्ली देखील उडवली होती. डक फेस म्हणजे बदकासारखा चेहरा होय. यातून ट्रोलर्सना म्हणायचे होते की अनुष्काचा चेहरा बदकासारखा दिसतो. शिवाय 2014 मध्ये सुद्धा लिप जॉब मुळे अनुष्काला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र अनुष्काने या सगळ्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे आपले काम केले आणि त्यामाध्यमातून लोकांची तोंडे बंद केली.

अनुष्काच्या सुंदर हास्यामागचं रहस्य

अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अनुष्काचा स्वत:चा असा एक चाहतावर्ग आहे. तिचे चाहते तिच्या सौंदर्यावर लट्टू आहेतच, पण त्यांना सर्वाधिक आवडते अनुष्काचे हसणे. अनुष्काचे हास्य हे बॉलीवूड मधील सर्वात सुंदर हास्यां’पैकी एक आहे असे म्हटले जाते. पण काय आहे तिच्या या सुंदर हास्यामागाचे रहस्य? चला जाणून घेऊया. हे रहस्य आहे ऑईल पुलिंग मेथडचे आहे. ऑईल पुलिंग मेथड एक अशी पद्धत आहे ज्याचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे. तोंडाची स्वच्छता आणि ओरल हेल्थची ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे.

ऑईल पुलिंग थेरेपी

अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

आपल्या दातांच्या शुभ्रपणाचे, हास्याचे आणि सुंदर त्वचेचे श्रेय अनुष्का ऑईल पुलिंग थेरेपीला देते. आपल्या एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने सांगितले की कशाप्रकारे ऑईल पुलिंग केल्याने ओरल हेल्थ आणि दातांना स्वस्थ राखता येते. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की ऑईल पुलिंग मेथड मध्ये तोंडात ऑईल भरून काही वेळ (3 ते 4 मिनिटे) ते तसेच रोखून धरायचे असते आणि योग्य प्रकारे पूर्ण तोंडामध्ये घुसळवायचे असते. यानंतर हे तेल बाहेर काढले जाते. अशी ही थेरेपी सौंदर्यशास्त्रामध्ये खूप लाभदायक मानली जाते.

अनुष्काकडून जाणून घ्या ऑइल पुलिंगची विधी!

स्कीनचा ग्लो वाढतो

अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

ऑईल पुलिंग पद्धतीचा वापर नियमितपणे उपाशी पोटी केला जातो. म्हणजेच सकाळी उठून तुम्हाला सर्वात पहिले काम करायचे आहे ते म्हणजे ऑईल पुलिंग करणे होय. यानंतर तुम्ही मोर्निंग-टी किंवा ज्युसचे सेवन करू शकता. नियमितपणे हि प्रक्रिया केल्याने तुमची स्कीन देखील अनुष्का शर्मा सारखी उजळून दिसेल आणि अधिक तेज त्यावर येईल. लक्षात ठेवा की अनुष्का या पद्धतीचा वापर खूप वर्षांपासून करत आहे. म्हणून तिचे दात अत्यंत शुभ्र आणि चमकदार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या पद्धतीचा वापर करणार असाल तर संयम बाळगा आणि न चुकता ही पद्धत वापरत राहा. तुम्हाला काही काळाने फरक नक्की दिसू लागेल.

ऑईल पुलिंगसाठी सर्वोत्तम तेल

अनुष्काला दिसण्यावरुन घाणेरड्या शब्दांत केलं ट्रोल, ट्रोलर्सची जिरवण्यासाठी उचललं हे पाऊल!

तुम्ही दरोरोज उठून ऑईल पुलिंग करू शकता. सकाळी ही प्रक्रिया केल्याने दातांसोबत पचन आणि मेटाबॉलिज्म दोन्ही ठीक राहते. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही ऑईल पुलिंग साठी नारळ तेल, तिळाचे तेल, बदाम तेल आणि मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता. नियमितपणे ऑईल पुलिंग केल्याने तुमच्या त्वचेमध्ये नैसर्गिक चमक येईल. ही पद्धत शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास देखील मदत करते. ऑईल पुलिंगच्या वेळेस रात्रभर शरीरात वाढणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यास सहाय्य मिळते आणि त्वचेचा ग्लो देखील वाढतो.

मनमोकळेपणाने हसणे व मजा-मस्ती करणे!

Source link