खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
104

जळगांव (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा याकरीता महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनात महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन यांचे म्हणणे होते की कोविड – 19 च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे.

हेही वाचा : ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध – मा. आमदार नरेंद्र पवार

त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे. अशातच काही खासगी शाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे.

हेही वाचा : ‘१२ जणांचं निलंबन केलं पण आघाडी सरकारचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे. त्यात ही शाळा ह्या इतर वेळी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत.
पालकांनी का म्हणून इतर “फी” द्यायची, तसेच सर्व सामान्य पालक आपल्या पल्यांना आपलेच पैसे खर्च करून मोबाइलला ला रीचार्ज करून आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भारत आहे. तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन “फी” घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी.

हेही वाचा : फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक

अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देते वेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे प्रदेश कमिटी सहसचिव दिपक सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख अँड. अभिजित जितेंद्र रंधे, खान्देश विभाग उपाध्यक्ष सचिन बिऱ्हाडे खान्देश विभाग सचिव चेतन चौधरी, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, संदीप कोळी उपस्थित होते.

हेही वाचा : राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या

हेही वाचा : शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार?

आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.